जडीबुटी दिन उत्साहात साजरा

0
जडीबुटी दिन उत्साहात साजरा

जडीबुटी दिन उत्साहात साजरा

उदगीर (एल.पी.उगीले) : पतंजली योग समितीच्या विद्यमाने आचार्य बालकृष्ण जी महाराज यांचा जन्मदिवस जडी बुट्टी दिन म्हणजेच औषधी दिन म्हणून साजरा करण्यात आला. शहर पोलीस स्टेशनचे नवीन पोलीस निरीक्षक अभिषेक जी शिंदे यांच्या हस्ते पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये दर्शनी भागामध्ये वृक्षांची लागवड करण्यात आली.करंज, निलगिरी, आपटा, पिंपळ या झाडांची लागवड करण्यात आली. त्याप्रसंगी नवीन पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदेसर, नितीन जवळे, महेश मुसळे, अभय मंडलापुरे, निखिल बुकटे, नितीन बेंबडे यांच्यासह पोलीस बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचबरोबर पतंजली योग समितीचे सुरेंद्र अकणगिरे, प्रा. श्रीराम चामले, बळवंत कुलकर्णी, डॉ. धनराज एकुंडे, प्रा.दत्ता कपिकेरे, शिवकुमार शिरगिरे, नारायणराव पाटील, सौ.मिनाक्षी ताई स्वामी , सौ.सुमती भातांबरे ताई,धनराज बीरादार व इतर बरेच साधक उपस्थित होते. पोलीस निरीक्षक शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!