सर्व समाज घटकांना सोबत घेवुन मतदार संघाचा विकास केला : ना. संजय बनसोडे
सर्व समाज घटकांना सोबत घेवुन मतदार संघाचा विकास केला : ना. संजय बनसोडे
उदगीर (एल.पी.उगीले) : मतदार संघातील जनतेने मतदान रुपी आशिर्वाद दिल्यानंतर मागील ५ वर्षाच्या काळात उदगीर मतदार संघात विकासाचा डोंगर उभा केला. रस्ते, वीज, पाणी व आरोग्यासह नागरिकांना मुलभुत सुविधा उपलब्ध करुन दिल्या. विविध इमारतीसह प्रत्येक समाजातील घटकाला केंद्रबिंदू मानून सर्व समाज घटकांना सोबत घेवुन मतदार संघाचा विकास केला असल्याचे मत राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी केले.
ते लोहारा ता.उदगीर येथील विविध विकास कामांच्या भुमीपुजन सोहळ्या प्रसंगी बोलत होते.
ना.संजय बनसोडे यांनी लोहारा येथील ग्रामदैवत महादेव मंदिर माळ बेट व गैबुसाब दर्गा उरूस यात्रेस भेट देवून दर्शन घेतले.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सिद्धेश्वर पाटील, भाजपाचे प्रवक्ते शिवानंद हैबतपुरे, बालाजी भोसले, शिवशंकर धुप्पे, सुनिल केंद्रे, श्याम डावळे, वसंत पाटील, सुशांत शिंदे, प्रवीण सुरडकर, सायस दराडे, सरपंच गणपत कांबळे, सुभाष कांबळे , श्याम सोनटक्के, चंदु भातमुडे, बबन धनबा, करखेलीचे सरपंच दिलीप शिंदे, उपसरपंच शंकर भातमुडे, मनोहर देवंग्रे, दिलीप पाटील, विजय कांबळे, उध्दव रक्षाळे, माधव कांबळे, अरविंद गिलचे, संदीप धनुरे, सतिश गायकवाड, विजयकुमार हेडगे, शेषॆराव हेळगे, ग्रामसेवक गजानन भोसले, एस.आर. कांबळे, प्रकाश हैबतपुरे, आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना ना.संजय बनसोडे यांनी, लोहारा येथील विविध विकास कामांसाठी कोट्यावधीचा निधी उपलब्ध करुन दिला असुन बुध्द विहारासाठी २५ लक्ष रु., डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी १० लक्ष, महादेव मंदिर बेट सभागृह बांधकामासाठी १० लक्ष, नरसिंगवाडी सभागृहासाठी ८ लक्ष, महादेव मंदिर प्रवेशव्दारासाठी १० लक्ष, मज्जीद ते उदगीर लातूर सी.सी. रोड १७ लक्ष, बालाजी रक्षाळे घराकडे जाणारा रस्ता १० लक्ष, मुस्लिम कब्रस्तान संरक्षण भिंत बांधकामासाठी ६ लक्ष रुपये असे एकुण ९६ लक्ष रुपयाच्या कामाचे भुमीपुजन करण्यात आले आहे. मागील ५ वर्षाच्या काळात आपण केलेली कामे जनतेपर्यंत पोहचवा. आपण केलेल्या कामामुळे जिल्ह्यात फक्त उदगीर मतदार संघाच्या विकासाची चर्चा आहे. भविष्य काळात मतदार संघाच्या विकासासाठी एकसंघ राहून विकास करु, त्यामुळे गटतट विसरून विकासासाठी एकत्र या. असे आवाहन करुन शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, त्यांच्या पाठीशी मी सदैव आहे. मागील काळातील आपल्या मतदार संघातील शेतक-यांच्या विम्याच्या प्रश्नासंदर्भात आपण स्वत: विमा कंपनीला आदेश दिले आहेत. महायुती सरकारने शेतक-यांना मोफत वीज देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. उदगीर मतदार संघात सौर ऊर्जेचे प्रकल्प उभारल्यामुळे या भागातील नागरीकांना भविष्यात २४ तास वीज मिळणार आहे. राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ मतदार संघात प्रभावीपणे राबवुन रक्षाबंधन पर्यंत माझ्या पात्र झालेल्या बहिणीच्या खात्यावर रक्कम जमा होईल. थोड्याच दिवसात मतदार संघातील विविध विकास कामांचे लोकार्पण सोहळे आपण घेणार असून उदगीर जिल्हा झाला पाहिजे म्हणून आपण सुविधा उपलब्ध केल्या आहेत. भविष्यात उदगीर जिल्हा करण्यासाठी आपण आग्रही मागणी केली आहे. महाराष्ट्रात छोट्या जिल्ह्यांची निर्मिती होईल तेंव्हा आपल्या उदगीरचा नंबर पहिला असेल असे आश्वासन ना.संजय बनसोडे यांनी सांगितले.
यावेळी लोहारा गावासह पंचक्रोशीतील भाविक – भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
