शिवसेना शिंदे गटाच्या अहमदपूर-चाकुर विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन
शिवसेना शिंदे गटाच्या अहमदपूर-चाकुर विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन
अहमदपूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यातील ग्रामीण अहमदपूर -चाकुर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक दिनांक ६ ऑगस्ट रोजी मंगळवारी दुपारी १:०० वाजता शासकीय ग्रह अहमदपूर येथे आयोजीत करण्यात आली आहे.
याविषयी सविस्तर माहीती अशी की विधान सभेच्या निवडणुकीचा कार्यकाळ जसा जसा जवळ येत आहे त्याअनुशंगाने सर्वच पक्ष कामाला लागले असुन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे यांच्या आदेशावरून विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम ताई गोरे व शिवसेना सचिव संजय मोरे ,मराठवाडा विभागीय संपर्कप्रमुख आनंदराव जाधव , लातूर जिल्ह्याचे निरीक्षक तथा संपर्कप्रमुख बालाजी काकडे महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख सौ.रंजनाताई कुलकर्णी
आदेशावरून जिल्हा संघटक गुलाबअण्णा पटवारी,
सह संपर्कप्रमुख ब्रह्माजी केंद्रे,सह संपर्कप्रमुख रवीद्रं गुरमे यांच्या प्रमुख उपस्थितीत अहमदपूर -चाकुर विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक दि ६ ऑगष्ट रोजी मंगळवारी दुपारी १.०० वाजता शासकिय विश्राम ग्रह अहमदपूर येथे आयोजीत करण्यात आली आहे.
या बैठकीला उपजिल्हाप्रमुख. तालुका संघटक, तालुकाप्रमुख, शहर संघटक, उप तालुका प्रमुख, विभाग प्रमुख,शहर प्रमुख व इतर सर्व अंगीकृत संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती आवश्यक आहे.महिला,पुरूष पदाधिकाऱ्यांची बैठक व सदस्य नोंदणी अभियान अत्यंत महत्त्वपूर्ण असून या बैठकीला गैरहजर राहु नये असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख (ग्रामीण) लातूर गोपाळ माने, महिला जिल्हाप्रमुख प्रीती कोळी यांच्यासह शिवसेना तालुका प्रमुख गोपीनाथ जायभाये शहर प्रमुख लक्ष्मण अलगुले विधानसभा सभा संघटक विठ्ठल मुळे यांनी केले आहे.
