यंदा श्रावण मासाची सुरुवात व सांगता सोमवारीच

0
यंदा श्रावण मासाची सुरुवात व सांगता सोमवारीच

यंदा श्रावण मासाची सुरुवात व सांगता सोमवारीच

अहमदपूर (गोविंद काळे) : हिंदू धर्मियांचे आराध्यदैवत देवाधिदेव महादेव, शिवशंकर, भोलेनाथ, ज्यांना प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी विविध नावाने पूजले जाते.
शिवलिंगाची पूजा पाठ, भक्ती, आराधना वर्षभर भाविक करत असतात. यामध्ये श्रावण महिना सर्वांत भक्तिमय व पवित्र मानला जातो. या महिन्यात महादेवाच्या पिंडीला अभिषेक करतात. शिव चालिसा, शिव तांडव स्तोत्र आणि श्रावण महिन्याची कथा पठण करतात. शिव मंदिरात जाऊन हर हर महादेव, ओम नमः शिवाय या जयघोषात शिवलिंगाला पंचामृत (दूध, दही, साखर, मध आणि तूप) अर्पित करतात. शिवलिंगाला जल अर्पण करून फुले व बेल वाहतात. तर अनेक भाविक बारा ज्योतिर्लिंग व विविध शिव मंदिरात दर्शनासाठी जात असतात,
या महिन्यात अनेक गावातून भाविक कावड यात्रा
काढतात अशा भक्तीमय वातावरणात हा महिना साजरा करत असतानी यंदा श्रवणाची सुरुवात व शेवट सोमवारीच होणार आहे.
सुमारे ७१ वर्षांनंतर हा दुर्मीळ योग आला आहे. या आधी सन १९५३ या वर्षी हा योग आला होता. यंदा श्रावणाला ५ ऑगस्ट सोमवारी सुरुवात होत आहे. तर सांगता २ सप्टेंबर सोमवारी होणार आहे. ३ सप्टेंबरला श्रावण अमावस्या आहे. श्रावणाच्या पहिल्याच दिवशी सोमवार येण्याचा हा ७१ वर्षांनंतरचा अतिशय दुर्मीळ योग आहे. यापूर्वी श्रावण सोमवार १० ऑगस्ट १९५३ रोजी श्रावणाला सुरुवात तर ८ सप्टेंबर १९५३ ला शेवटचा सोमवार आला होता. व यंदाच्या श्रावणाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ५ श्रावणी सोमवार असणार आहेत. १८ वर्षांनंतर यंदा ५ श्रावणी सोमवार ही आले आहे. यामुळे भाविकांसाठी ही पर्वणीच ठरणार आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!