इनर व्हील क्लबच्या वतीने प्रा.डॉ.सुनिता शिंदे जगताप यांना भावपूर्ण श्रद्धांजली

0
इनर व्हील क्लबच्या वतीने प्रा.डॉ.सुनिता शिंदे जगताप यांना भावपूर्ण श्रद्धांजली

इनर व्हील क्लबच्या वतीने प्रा.डॉ.सुनिता शिंदे जगताप यांना भावपूर्ण श्रद्धांजली

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील इनर व्हील क्लबच्या माजी अध्यक्षा तथा पहिल्या कोषाध्यक्षा प्रा.डॉ. सुनिता मधुकर शिंदे-जगताप यांचे दि. 2ऑगस्ट रोजी हैदराबाद येथे उपचार सुरू असताना दुःखद निधन झाले. जागतिक मैत्री दिनाच्या दिवशी फ्रेंडशिप बँड बांधण्या ऐवजी एका मैत्रिणीला दोन मिनिटांचे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. मैत्रिणींना आपल्या भावना शब्दात व्यक्त करताना अश्रू अनावर झाले होते.खूप जड अंतःकरणाने श्रद्धांजली वाहण्यात आली.
सुनिता शिंदे यांच्या जाण्याने खूप मोठी पोकळी निर्माण झाली असून ती कधीही भरून निघणार नाही अशा भावना डॉ. अंजली उगिले यांनी व्यक्त केल्या. यावेळी प्राचार्या रेखाताई तरडे,प्राचार्या शोभा टोम्पे, योगशिक्षिका कलावती भातांब्रे,संगीता खंडागळे,शैलजा सांगवीकर, मंजुषा फुलारी, डॉ. मीनाक्षी करकनाळे, डॉ.वर्षा भोसले, मुख्याध्यापक दर्शना हेंगणे, कोषाध्यक्षा सुरेखा उगिले, एडवोकेट सुवर्णा महाजन, यांनी मनोगत पर भाषणातून सुनीता शिंदे यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांची गुणविशेष सांगितले. प्रस्ताविक क्लबच्या अध्यक्षा विजया भूसारे यांनी केले. सूत्रसंचालन आशा रोडगे-तत्तापुरे यांनी केले तर आभार उपाध्यक्षा पूजा रेड्डी यांनी मानले. यावेळी सचिव रेखा बालूरे, माजी अध्यक्षा मीना भुतडा, सुनीता गुणाले, शितल मालू, मेघना रेड्डी, सुनंदा रेड्डी, शिल्पा हंगरगे, जयश्री देशमुख, पूजा गुणाले, प्राचार्या सारिका उगिले, ज्योती जाधव सह इनरव्हील क्लबच्या सदस्या व पदाधिकारी उपस्थित होत्या. सुनीता शिंदे यांच्या अचानक जाण्याने सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!