महात्मा फुले महाविद्यालयात कै.बापूसाहेब पाटील एकंबेकर यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

0
महात्मा फुले महाविद्यालयात कै.बापूसाहेब पाटील एकंबेकर यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

महात्मा फुले महाविद्यालयात कै.बापूसाहेब पाटील एकंबेकर यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात किसान शिक्षण प्रसारक मंडळ, उदगीरचे संस्थापक, महाराष्ट्र कर्नाटक सीमा लढ्याचे प्रणेते तथा माजी आमदार स्वर्गीय बापूसाहेब पाटील एकंबेकर साहेब यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आय.क्यू.ए.सी. विभागांतर्गत घेण्यात आलेल्या स्वर्गीय बापूसाहेब पाटील एकंबेकर स्मृतिदिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी हे होते तर प्रशांत डोंगळीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय बापूसाहेब पाटील एकंबेकर यांना पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तर अध्यक्षीय समारोपप्रसंगी उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांनी बापूसाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला व बापूसाहेबांनी शैक्षणिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रात तसेच सीमा भागातील मराठी बांधवांसाठी केलेल्या कार्याचाही गौरव केला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. पांडुरंग चिलगर यांनी केले तर आभार संस्कृत विभाग प्रमुख डॉ. प्रशांत बिरादार यांनी मानले. यावेळी प्रो. डॉ. नागराज मुळे, प्रो. डॉ. अभिजीत मोरे, डॉ. सचिन गर्जे, डॉ. किरण गुट्टे, डॉ. संतोष पाटील, अजय मुरमुरे, चंद्रकांत शिंपी, शिवाजी चोपडे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!