शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हजारो सदस्यांची सदस्य नोंदणी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हजारो सदस्यांची सदस्य नोंदणी
९५ वर्षाच्या आजोबांनी केली सदस्य नोंदणी
अहमदपुर (गोविंद काळे) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने इ.स.२०२४ ते २०२६ या दोन वर्षासाठी सदस्य नोंदणी करण्यात येत आहे.
उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्यात सदस्य नोंदणी करण्यात येत आहे. सदस्य नोंदणी वेळी मराठवाडा समन्वयक तथा उपनेते विश्वनाथ नेरुरकर, उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्हिडिओ काॅलद्वारे जनतेशी संवाद साधला यावेळी रामराम गोविंदराव रेकडवाड रा.गंगाहिप्परगा वय ९२ वर्षे यांनी संवाद साधत सदस्य नोंदणी करुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली सदस्य नोंदणी करुन भगवा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्या निमित्ताने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हजारोंच्या संख्येने सदस्य नोंदणी करण्यात आली. वयोवृद्ध नागरिकांनी सहभागी होऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रती ममत्व व्यक्त केले. धानोरा येथील श्री. व्यंकटी बाबुराव चामे वय ९५ वर्षाचे आजोबा बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल सहानुभूतीने बोलत, माझा सदस्य नोंदणीचा फॉर्म भरून घ्या म्हणत त्यांनी उत्साहाने आपली सदस्य नोंदणी करुन घेतली. तालुक्यातील हजारो शिवसैनिक, महिलांनी सहभाग नोंदवून उत्स्फूर्तपणे सदस्य नोंदणी केली. नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत विजय सुरनर यांची पोलिस उपनिरीक्षकपदी नियुक्ती झाल्या बद्दल त्यांचा सत्कार शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, उपजिल्हा प्रमुख भारत सांगवीकर, तालुका प्रमुख विलास पवार हंगरगेकर, तालुका संघटक प्रा. संतोष रोडगे, शहर प्रमुख शिवा कासले, नगरसेवक संदीप चौधरी,उपतालुका प्रमुख अनिकेत फुलारी, दत्ता हेंगणे, गणेश माने, लहू बारवाड,उपशहरप्रमुख शिवकुमार बेद्रे, कार्यालय प्रमुख सुभाष गुंडीले,सहसचिव पद्माकर पेंढारकर,माऊली देवकत्ते,कालिदास धुळगुंडे, गणेश चव्हाण, गणेश राठोड, धनंजय तुडमे, महेश मोरे, विठ्ठल चिडगीर, दत्ता कदम, बाळासाहेब पडीले, सुधाकर बालवाड,विजय ढाकणे यांच्यासह असंख्य शिवसैनिक,नागरीकांची उपस्थिती होती.
