आवड, आनंद आणि कर्तव्य स्वभावात असल्यास यश प्राप्त होते – गणेश हाके
आवड, आनंद आणि कर्तव्य स्वभावात असल्यास यश प्राप्त होते - गणेश हाके
अहमदपूर (गोविंद काळे) : विद्यार्थ्यांनी आपले ध्येय डोळ्यासमोर ठेवून चिकाटीने निरंतर कष्ट केल्यास आपला हेतू साध्य होतो.त्यासाठी आपल्या स्वभावात आवड, आनंद आणि कर्तव्य असणे आवश्यक आहे त्यानंतरच यश प्राप्त होते असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष तथा भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके पाटील यांनी केले. ते आज पु अहिल्यादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सांगवी सु येथे आयोजित केलेल्या इयत्ता अकरावीच्या विद्य्यार्थ्यांचा स्वागत समारंभ तथा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आणि नुतन संसद मंडळाचा सत्कार व शपथविधी सोहळ्याच्या अध्यक्षीय स्थानावरून बोलत होते.यावेळी व्यासपीठावर लातूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष सुधाकरराव तेलंग, प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवशटवार, उपविभागीय पोलिस अधिकारी मनिष कल्याणकर, पोलिस निरीक्षक बी डी भुसनुर,सांगवी सु चे सरपंच राजेश कांबळे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गिरी, जिल्हा सरचिटणीस प्रा हणमंत देवकते, भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रताप पाटील, तालुका विस्तारक चंद्रशेखर डांगे, शहराध्यक्ष प्रशांत गुणाले, चेअरमन राजकुमार नरवटे, भाजपाचे तालुका उपाध्यक्ष परमेश्वर पाटील, सय्यद आरिफ, श्री संत सद्गुरू विद्यालय उजनाचे मुख्याध्यापक चंद्रशेखर मोरे ,बळीराजा विद्यालयाचे मुख्याध्यापक पांडुरंग शेकडे,संजय गांधी विद्यालय माळेगावचे मुख्याध्यापक गोविंदराव धुळगंडे, बालाजी हेमनर, प्रशांत शिंदे, सेवानिवृत्त शिक्षिका केवलताई तिगोटे, सेवानिवृत्त शिक्षक साईनाथ डोंगरे यांच्यासह संस्थेच्या सचिव तथा भाजपाच्या महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस प्राचार्या रेखाताई तरडे हाके आदींची उपस्थिती होती.
या कार्यक्रमात इयत्ता बारावी कला मधील प्रथम कोतवाडे स्नेहा, द्वितीय गायकवाड निकिता, तृतीय फुलमंटे तृप्ती, विज्ञान मधील प्रथम उदगिरे सुमित, द्वितीय एकनाथ यादव, तृतीय पाटील आदिती यांचा तर दहावी मधील प्रथम सुरनर ऋतुजा, द्वितीय सुरनर धनश्री तसेच इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती धारक तथा नवोदय धारक यशराज लोहकरे व इयत्ता आठवी शिष्यवृत्ती धारक शैलजा वडेर यांचा पालकांसह सत्कार करण्यात आला.यावेळी विशेष सत्कार सय्यद सादिया हिने नीट परीक्षेत ६६२ गुण घेतल्याने आणि साळवे यशवंत याने नीट परीक्षेत ५४१ गुण घेऊन घवघवीत यश संपादन केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते पालकांसह सत्कार करण्यात आला.तर शाळेचे माजी विद्यार्थी मोहन देवकते, प्रमोद पवार आणि शेख इमाम यांची या वर्षात पोलिस विभागात भरती झाल्याने त्यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रादेशिक उपायुक्त श्री देवशटवार म्हणाले की अतिशय निसर्गरम्य परिसरात शाळा असून वृक्षवल्ली आम्हा सोयरे हे वाक्य तंतोतंत या शाळेला लागु होत असून गुणवत्तेसाठी धडपड करणारा संघ व नेतृत्व असल्यास अशा प्रकारच्या शाळा घडतात व त्यातूनच विद्यार्थी घडत असतात.तर लातूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष सुधाकरराव तेलंग यांनी तब्बल दीड तास मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना अभ्यास, परीक्षा बाबत मार्गदर्शन करताना म्हणाले की विद्यार्थ्यांनी फक्त टाॅपर हेच लक्ष्य असावे आणि एकच पद आहे व ते मलाच मिळणार असे सकारात्मक विचार करुन अभ्यास करावे असे आवाहन करत विविध उदाहरणे देत विद्यार्थ्यांसोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या.तर उपविभागीय पोलिस अधिकारी मनिष कल्याणकर यांनी अभ्यास करताना सर्व इंद्रियांचे सर्व दारे खुले ठेवावे व अभ्यासाला ओझे न समजता अभ्यास करावा असे सांगितले.तर पोलिस निरीक्षक बी डी भुसनुर यांनीही मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या रेखाताई तरडे यांनी केले तर सुत्र संचालन प्रा दैवशाला शिंदे आणि जिलानी शेख यांनी केले तर आभार प्रा संतोष मुळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजकुमार बुर्ले, रमेश चेपूरे, अच्युत सुरनर, संभाजी दुर्गे, चिंतन गिरी,तुकाराम शिंगडे, प्रदीप रेड्डी, अमोल सारोळे, कौशल्या देवकते, जनार्दन मासोळे, गणेश जाधव, तेजस्विनी फाजगे, मयुर मोरे, हिदायत शेख, संजय कजेवाड, अनंत उदगिरे, विश्वंभर सुरनर आदींनी परिश्रम घेतले.यावेळी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
