अध्यात्माने निसर्ग यांचा सुंदर संगम म्हणजे श्री मल्लेश्वर महादेव मंदिर
अध्यात्माने निसर्ग यांचा सुंदर संगम म्हणजे श्री मल्लेश्वर महादेव मंदिर
चाकुर ,उदगीर व अहमदपूर यांच्या सीमेवरील हेमाडपंती मंदिर.
अहमदपूर (गोविंद काळे) : अध्यात्म आणि निसर्ग यांचा सुंदर संगम म्हणजे अहमदपूर चाकूर व उदगीर या तालुक्याच्या सीमेवर बालाघाटाचा डोंगर रांगेमध्ये उंच ठिकाणी असलेले श्री मल्लेश्वर मंदिर हे हजारो भाविकांच्या श्रद्धेचे स्थान आहे.
हेमाडपंती बांधकाम असलेले हे मंदिर एक वास्तुशिल्पाचा सुंदर नमुना तर आहेच याशिवाय एवढ्या उंचावर मोठे मोठे दगडी शेळ आणि कसे बांधकाम केले असेल हे एक मोठे आश्चर्यच आहे.
श्री मल्लेश्वर महाराज यांचे बंधू येथून जवळच असलेल्या चाकूर जवळ बेटावर स्थायिक झाल्याचे ही व्याख्या काय सांगितले जाते.
या मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात महादेवाची पिंड आहे. बाजूच्या खोलीमध्ये एक विहिरी आहे असे सांगितले जाते की या विहिरीला पूर्वी कितीही उन्हाळा असला तरी पाणी येत राहायचे. व या मंदिराच्या परिसरात पूर्वीच्या काळी म्हणजे शेकडो वर्षांपूर्वी वाघ, सिंह यांचेही अस्तित्व होते.
श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणी दर्शनासाठी आंध्र प्रदेश महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यातील भाविक मोठ्या संख्येने येतात व श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी या ठिकाणी खूप मोठी यात्रा भरते.
या ठिकाणी असलेले शेळगाव, किनी यल्लादेवी व डोंगरज या ग्रामपंचायतीच्या हद्दीत मध्ये हे श्री मल्लेश्वर मंदिर आहे.
या मंदिराची जोडलेली अशी आख्यायिका आहे की एका रात्रीतून या मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्यात आले .
बालाघाटच्या डोंगरगंगेमध्ये उंच ठिकाणी असल्यामुळे हे मंदिर थंड हवेचे ठिकाण ही आहे. उन्हाळ्यात मंदिरातील तापमान कमी असते. . यामुळे उन्हाळ्यात या ठिकाणी खूप थंड असतो.
या मंदिराचे शिखर खूप उंच ठिकाणी असल्यामुळे खूप दूरच्या भागातून हे दिसते, जेवढ्या भागातून हे मंदिराचे शिखर दिसते एवढ्या भागातील लोक श्री मल्लेश्वरास कुलदैवत म्हणून या ठिकाणी पूजा पाठ करून त्यांच्या घरी परिवारात होणाऱ्या सर्व शुभकार्याची सुरुवात करतात
श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी या ठिकाणी मोठी यात्रा भरते व जंगी कुस्त्याचा मोठा फडही या ठिकाणी रंगतो शेकडो पैलवान या कुस्त्यामध्ये भाग घेतात.
या मंदिराच्या भोवती असलेल्या परिसरामध्ये वन विभागाने लाखो झाडे लावल्यामुळे हा एक निसर्गरम्य परिसर बनला आहे व एक पर्यटन स्थळ ही आहे. त्यामुळे श्री मल्लेश्वर मंदिर हे एक आध्यात्मिक केंद्र तर आहेच यांशिवाय निसर्गाच्या सानिध्यात वसलेले सुंदर असे पर्यटन स्थळ आहे.
या मंदिर परिसराला महाराष्ट्र शासनाने आणखीन विशेष मदत करून हे चांगले पर्यटन स्थळ म्हणून विकसित करणे गरजेचे आहे. याशिवाय यावर्षी श्रावण महिन्याचा एक वेगळाच महिमा आहे. यंदा श्रावण मासाची सुरुवात व सांगता सोमवारीच… ७१ वर्षानंतर सुवर्णयोग तर १८ वर्षानंतर ५ सोमवार
अहमदपूर /अनिल चवळे हिंदू धर्मियांचे आराध्यदैवत देवाधिदेव महादेव, शिवशंकर, भोलेनाथ, ज्यांना प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी विविध नावाने पूजले जाते.
शिवलिंगाची पूजा पाठ, भक्ती, आराधना वर्षभर भाविक करत असतात. यामध्ये श्रावण महिना सर्वांत भक्तिमय व पवित्र मानला जातो. या महिन्यात महादेवाच्या पिंडीला अभिषेक करतात. शिव चालिसा, शिव तांडव स्तोत्र आणि श्रावण महिन्याची कथा पठण करतात. शिव मंदिरात जाऊन हर हर महादेव, ओम नमः शिवाय या जयघोषात शिवलिंगाला पंचामृत (दूध, दही, साखर, मध आणि तूप) अर्पित करतात. शिवलिंगाला जल अर्पण करून फुले व बेल वाहतात. तर अनेक भाविक बारा ज्योतिर्लिंग व विविध शिव मंदिरात दर्शनासाठी जात असतात,
या महिन्यात अनेक गावातून भाविक कावड यात्रा
काढतात अशा भक्तीमय वातावरणात हा महिना साजरा करत असतानी यंदा श्रवणाची सुरुवात व शेवट सोमवारीच होणार आहे.
सुमारे ७१ वर्षांनंतर हा दुर्मीळ योग आला आहे. या आधी सन १९५३ या वर्षी हा योग आला होता. यंदा श्रावणाला ५ ऑगस्ट सोमवारी सुरुवात होत आहे. तर सांगता २ सप्टेंबर सोमवारी होणार आहे. ३ सप्टेंबरला श्रावण अमावस्या आहे. श्रावणाच्या पहिल्याच दिवशी सोमवार येण्याचा हा ७१ वर्षांनंतरचा अतिशय दुर्मीळ योग आहे. यापूर्वी श्रावण सोमवार १० ऑगस्ट १९५३ रोजी श्रावणाला सुरुवात तर ८ सप्टेंबर १९५३ ला शेवटचा सोमवार आला होता. व यंदाच्या श्रावणाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ५ श्रावणी सोमवार असणार आहेत. १८ वर्षांनंतर यंदा ५ श्रावणी सोमवार ही आले आहे. यामुळे भाविकांसाठी ही पर्वणीच ठरणार आहे.
अहमदपूर तालुक्यातील श्री महेश मंदिर शिरूर ताजबंद, पाण्यामध्ये शिवलिंग असलेले महादेव मंदिर तीर्थ, मन्याड नदीच्या पात्रात असलेले श्री महादेव मंदिर चिल्का, बेलजाळी येथे असलेले श्री महादेव मंदिर.
अहमदपूर येथे असलेले सर्वांच्या आकांक्षा पूर्ण करणारे श्री महादेव मंदिर.
ये तालुक्यातील सर्वांचे आदरस्थान असलेले महादेव मंदिर आहे तिथे प्रत्येक सोमवारी भाविकांची गर्दीत गर्दी होते व भाविका अतिशय श्रद्धा व भक्ती भवानी या ठिकाणी दर्शन घेतात.
