सिद्धी शुगर कारखाना जास्तीत जास्त ऊस गाळप करणार – माजीमंत्री बाळासाहेब जाधव
सिद्धी शुगर कारखाना जास्तीत जास्त ऊस गाळप करणार - माजीमंत्री बाळासाहेब जाधव
अहमदपूर (गोविंद काळे) : यावर्षीच्या गळीत हंगामात सिद्धी शुगर कारखान्याचे जास्तीत जास्त टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून यावर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांनी सांगितले.
ते महेश नगर, उजना येथे श्रावण मासारंभ चे औचित्य साधून सिद्धी शुगर अॅण्ड अलाईड इंडस्ट्रिज लि. या कारखान्याचे २०२४ -२५ चे मिल रोलर पूजन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव यांच्या शुभहस्ते रोलर चे पुजन करण्यात आले. यावेळी सिद्धी शुगरचे डायरेक्टर तथा शिरूर ताजबंद चे उपसरपंच सुरजभैय्या पाटील यांनी उपस्थित राहून रोलरचे पूजन केले.
पुढे बोलताना माजीमंत्री जाधव म्हणाले की, पावसामुळे शेतकऱ्यांच्या ऊस लागवडीचे क्षेत्र वाढणार असून आपल्या कारखान्यासह सभोवतालच्याही कारखान्यांना सुद्धा पुढील हंगामासाठी मोठ्या प्रमाणात उसाची उपलब्धता होणार असल्याचे माजी मंत्री बाळासाहेब पाटील साहेब यांनी सांगितले. तसेच गळीत हंगाम योग्य व नियोजनबद्ध पद्धतीने आपल्या सर्वांच्या सहकायानें यशस्वीपणे पार पडेल, असा विश्वास कारखान्याचे आधारस्तंभ माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांनी व्यक्त केला. याप्रसंगी कारखान्याचे व्हाईस प्रेसिडेंट पी. जी. होनराव, जनरल मॅनेजर एस.आर. पिसाळ, जनरल मॅनेजर टेक्नीकल बी. के. कावलगुडेकर, जनरल मॅनेजर (केन) पी.एल. मिटकर, जनरल मॅनेजर (डिस्टीलरी) एस.बी. शिंदे, चिफ फायनान्स ऑफिसर डॉ. आनंद पाटील, कंपनी सेक्रेटरी एस.टी. सावंत, प्रशांत पाटील, बँक स्थायी तपासणी अधिकारी आकुस्कर, डिस्टीलरी मॅनेजर सागर जाधव, डे. चिफ इंजिनिअर श्री. मुलानी, इन्स्ट्रमेंट इंजिनिअर लोखंडे, डे. चिफ केमीस्ट शामराव मॅनेजर एस.आर. पिसाळ, (जनरल मॅनेजर टेक्नीकल) बी. के. कावलगुडेकर, जनरल मॅनेजर (केन). पी.एल. मिटकर, जनरल मॅनेजर (डस्टिीलरी) एस.बी. शिदे, चिफ फायनांस ऑफिसर डॉ. आनंद पाटील, कंपनी सेक्रेटरी एस.टी. सावंत, प्रशांत पाटील, आकुस्कर (बैंक स्थायी तपासणी अधिकारी.) डिस्टीलरी मॅनेजर सागर जाधव, डे. चिफ इंजिनिअर मुलानी, इन्स्ट्रमेंट इंजिनिअर लोखंडे, डे. चिफ केमीस्ट शामराव लकडे, ऊस विकास अधिकारी वाय.आर.टाळे, उजना येथील दुधसंकलन केंद्राचे चेअरमन बापुसाहेब जाधव व प्रगतशिल शेतकरी संतोष कदम, प्रताप फाजगे यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी, कामगार बांधव उपस्थित होते.
