झाडांचे गुणगाव गाऊ, झाडांचे गुण घेऊन त्यांचे संगोपन करूया – अभिनेता सयाजी शिंदे यांचे प्रतिपादन
झाडांचे गुणगाव गाऊ, झाडांचे गुण घेऊन त्यांचे संगोपन करूया - अभिनेता सयाजी शिंदे यांचे प्रतिपादन
अहमदपूर (गोविंद काळे) : आज समाजातील प्रत्येक जण आपल्या कामांमध्ये व्यस्त आहे. कोणाचेही पर्यावरण वसंतुलनाकडे लक्ष नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी सर्वांनी झाडांची गुण गाऊन, झाडांचे गुण घेऊन त्यांचे आपल्या मुला मुलीप्रमाणे संगोपन करा असे आग्रही प्रतिपादन प्रसिद्ध चित्रपट अभिनेते तथा सह्याद्री देवराईचे प्रमुख सयाजी शिंदे यांनी केले.
ते दि चार रोजी देवराई प्रतिष्ठान च्या वतीने मैत्री दिनाच्या निमित्ताने प्रसाद मंगल कार्यालयात आयोजित पंचायत समितीच्या माजी सभापती पुष्पाताई घोटे-पाटील यांच्या बिज तुला व पर्यावरण जागरण सोहळ्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
या सोहळ्याच्या अध्यक्षांनी माजी आमदार शंकरांना धोंडगे, व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध चित्रपट पटकथा लेखक अरविंद जगताप, माजी सभापती पुष्पाताई घोटे पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी सयाजी शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, बिजारोपणाचा जागर घराघरात झाला पाहिजे. घरात जेवढे माणसं तेवढी झाडे अंगणामध्ये असली पाहिजे असे सांगितले.
यावेळी लेखक अरविंद जगताप म्हणाले की शाळा महाविद्यालयातून आणि खुल्या समाज व्यवस्थेमध्ये सुद्धा पर्यावरणाचे महत्त्व सांगून त्याची अंमलबजावणी शासनाच्या वतीने झाली पाहिजे असे सांगितले.
सोहळ्याचे अध्यक्षीय समारोप माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांच्या भाषणाने झाला.
मातोश्री पुष्पाताई घोटे यांच्या अमृता महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने त्यांची बीज तुला करून बियांचे व वृक्षांचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक सुशील घोटे पाटील यांनी सूत्रसंचालन रामलिंग तत्तापुरे यांनी तर आभार एडवोकेट सुचिता घोटे पाटील यांनी मांनले.
कार्यक्रमाचा शुभारंभ यशवंत विद्यालय आणि संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी झाडे जपायला हवे या गीताने करण्यात आला.
या सोहळ्याला सामाजिक कार्यकर्ते वसंतराव शेटकर,सहदेव होनाळे, रोकडा सावरगाव तंटामुक्तीचे अध्यक्ष शिवकुमार घोटे पाटील, सेवानिवृत् कार्यकारी अभियंता राम घोटे, ओम प्रकाश पुणे,काशिनाथ गाढवे, राजकुमार मजगे , चंद्रकांत मदे,केदार काडवदे, आशा रोडगे, प्रा. निर्मला कोरे, रामभाऊ बेल्लाळे, विकास महाजन, दिगंबर कदम.. विविध शाळांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, वकील, डॉक्टर, प्राध्यापक, अभियंता,शेतकरी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
