हडोळती येथे शिवसेना सदस्य नोंदणीस मोठा प्रतिसाद;महीलांचा उत्स्फूर्त सहभाग

0
हडोळती येथे शिवसेना सदस्य नोंदणीस मोठा प्रतिसाद;महीलांचा उत्स्फूर्त सहभाग

हडोळती येथे शिवसेना सदस्य नोंदणीस मोठा प्रतिसाद;महीलांचा उत्स्फूर्त सहभाग

अहमदपुर (गोविंद काळे) अहमदपुर तालुक्यातील हडोळती येथे डॉ बाबासाहेब ऑबेडकर चौकात मंगळवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने २०२४ ते २६ या दोन वर्षांसाठी सदस्य नोंदणी चालू असून या नोंदणीसाठी युवक , पौढ , महीलाची सदस्य नोंदणीसाठी गर्दी होत असून या मध्ये विशेष बाब महीलाची संख्या लक्षणीय ठरत आहे .
शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्यात भगवा सप्ताह साजरा निमित्य सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे उध्दव ठाकरे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावे असे शिवसैनिक व नागरीकाची इच्छा आहे त्यामूळे सदस्य नोंदणीला उदंड असा प्रतिसाद मिळत आहे .

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची सदस्य नोंदणी सुरू आहे त्यामूळे परिसरातील हडोळती , सावरगांव थोट ,हंगरगा , वळसंगी , आंनदवाडी , हीप्पळगांव , उन्नी , कीन्नी, परिसरातील गावातील शिवसैनिकाशी संवाद साधत शिवसेना जिल्हा प्रमुख बालाजी रेड्डी यांनी सदस्य नोंदणी करण्यासाठी अवाहन केले होते त्यामूळे परिसरातील शेकडो शिवसैनिकानी हडोळती येथे सदस्य नोंदणी केली .
यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख बालाजी रेड्डी , उपजिल्हा प्रमुख भारत सांगवीकर , मा.पं. सदस्य विलास पवार , तालुका प्रमुख विलास पवार हंगरगेकर , बाजार समिति संचालक संतोष रोडगे ,नगरसेवक संदीप चौधरी , उप ता. प्रमुख दत्ता हेंगणे, सुभाष गुंडीले, अभंग मोठे , पदमाकर पेंढारकर , शिवाजी पाटील , विठ्ठल भोगे , वसंत पवार , जितेंद्र पवार , मुस्तफा पठाण , शिवा बन्सेवाड, उमाकांत कांबळे , मुन्ना पवार , संगम गोरे , शंकर बारोळे , गिरीश कुलकर्णी, गोपाळ चापटे, शिवसैनिक व परिसरातील असंख्य नागरीक उपस्थीत होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!