सुरनर ज्ञानेश्वरी हिची ‘गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा’ या कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट कामगिरी
सुरनर ज्ञानेश्वरी हिची ‘गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा’ या कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट कामगिरी
उदगीर (एल.पी.उगीले) : तालुक्यातील मौजे कल्लूर येथील श्री पांडूरंग विद्यालयाची विद्यार्थिनी ह.भ.प. कुमारी सुरनर ज्ञानेश्वरी वामन हिने झी टॉकीज या चॅनेलवर प्रसारित होणाऱ्या ‘गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा’ या लोकप्रिय कार्यक्रमात गायनाचार्य म्हणून अप्रतिम सादरीकरण केले. तिच्या सुमधुर आवाजाने आणि उत्कृष्ट गायन कौशल्याने सर्व प्रेक्षकांचे मन जिंकले.परंतु या वेळेस तिच्या आवाजाने आणि गाण्याच्या सादरीकरणाने कार्यक्रमाला एक वेगळी उंची दिली. तिच्या सादरीकरणातील भावपूर्णता आणि निपुणतेमुळे प्रेक्षक आणि तज्ञांनी तिचे मनःपूर्वक कौतुक केले.संस्थेचे सचिव विनायकरावजी बेंबडे, मुख्याध्यापक नादरगे एस.व्ही. वर्ग शिक्षक सुडे एम.पी. मार्गदर्शक नादरगे सी.बी. आणि इतर शिक्षक वृंद यांनी ज्ञानेश्वरीच्या या यशाचे कौतुक केले.बेंबडे यांनी कौतुक करताना म्हटले, “ज्ञानेश्वरी हिच्या या यशाने शाळेचे, गावचे व परिसराचे नाव लौकिक केले आहे. तिच्या मेहनतीने आणि चिकाटीने ती आज या ठिकाणी पोहोचली आहे. तिचे हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. ज्ञानेश्वरीच्या पालकांनीही तिच्या यशाचे स्वागत केले आणि तिच्या कष्टांमुळेच ती आज या स्तरावर पोहोचल्याचे सांगितले. शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी वर्गाने तिचे अभिनंदन केले, आणि तिला पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या.
