लक्ष्मी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
लक्ष्मी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
लातूर (प्रतिनिधी) : लक्ष्मी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि लातूर या बँकेची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, दि. ०३.०८.२०२४ रोजी अग्रेसन भवन, लातूर येथील सभागृहात उत्साहात संपन्न झाली.
सभेपुर्वी सहकार प्रशिक्षण केंद्र लातूर यांचेकडून प्राध्यापक श्रीपती येळीकर यांनी सहकार शिक्षण/ प्रशिक्षण कार्यक्रम घेतला. सभेची सुरुवात लक्ष्मीच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करून करण्यात आली, तसेच दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बँकेचे वरिष्ठ अधिकारी हनुमानदास बांगड यांचा सेवानिवृत्ती निमित्त सपत्नीक सन्मान करण्यात आला.
सभेचे अध्यक्ष व बँकेचे चेअरमन अशोक अग्रवाल यांनी सभेचे प्रास्तविक व अहवाल वाचन केले. अशोक अग्रवाल यांनी मागील काळात बँकेने केलेल्या आर्थिक व सामाजिक कार्याचा अहवाल हा सभागृहासमोर मांडला, ९ % लाभांश जाहीर करताच सभासदांनी टाळाच्या गजरात दाद दिली. बँकेने घेतलेल्या जागेवर बांधकाम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. बँकेकडून सुरू करण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती त्यांनी सभागृहास दिली, “आपल्या बँकेचे डिजिटल बँकिंग मध्ये रूपांतर झाले असल्याचे” त्यांनी सांगितले. मोबाईल बँकिंग व ईतर सुविधेचा लाभ घेण्याचे त्यांनी सभासद व ग्राहकांना आवाहन केले. बँकेला अविज पब्लिकेशन कोल्हापूर यांचेकडून सलग तीनवेळा बँको पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनी सर्व संचालक, सभासद, ग्राहक व कर्मचारी यांचे अभिनंदन केले. बँकेचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश आळंदकर यांनी सभेचे विषय मांडले व उपस्थित सभासदांनी टाळ्यांच्या गजरात विषयांना मान्यता दिली. शाखेतील काही ग्राहकांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. सभासद सुरेश धानुरे यांनी सभेत प्रस्ताव मांडला की, बँकेचे बांधकाम सुरू असल्याने या वर्षीचा(सन २०२३-२४) लाभांश संभासदांना न देता, लाभांश रक्कम बँकेच्या बांधकामासाठी वापरावी, यावर सभासद गोविंद पारिख यांनी अनुमोदन दिले व उपस्थित संभासदांनी यास टाळ्यांच्या गजरात मान्यता दिली.
सभेसाठी बँकेचे चेअरमन अशोक अग्रवाल, व्हा. चेअरमन सतिष भोसले, संचालक सूर्यप्रकाश धूत, लक्ष्मीकांत सोमाणी, अजितलाल आळंदकर, विजय वर्मा,सौ.कमलादेवी राठी, सौ. माला भुतडा,सौ. रचना ब्रिजवासी, आशिष अग्रवाल, गणेश हेडडा, विशाल हलवाई, तज्ञ संचालक किशोर भराडिया, माजी संचालक प्रल्हाद दुडिले, सभासद उत्तमराव मोहिते, सुरेश धानुरे, किशोर बिदादा, रविंद्र करजगे, हरीकिशन तोष्णीवाल, गोविंद पारिख, वामनराव कदम, अनिल कदम, बबन सूर्यवंशी, शाखा सल्लागार विश्वनाथ म्हेत्रे, अतुल कोटगिरे, बालाजी कोंडावार, शिवप्रसाद लडडा, तसेच लक्ष्मीकांत कुलकर्णी, शिवकुमार सांगवे, बँकेचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश आळंदकर, अधिकारी प्रताप जाधव, सुशील जोशी, संतोष बनभेरु, रविंद्र मदने, सुहास राजमाने, सिद्धेश्वर पवार, महेश मोरे, शाखाधिकारी अनिता कातपुरे, मारोती कूकुटलावार, शिवकुमार राजमाने, परमेश्वर कडकंजे, अनुप सुवर्णकार, अनंत दिक्षित, उमाकांत सुर्यवंशी, शिवकुमार ढोबळे तसेच सभासद, ग्राहक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बँकेचे व्हा. चेअरमन सतिष भोसले यांनी आभार मानताना बँकेच्या वाटचालीत सर्व संचालक, सभासद, ग्राहक,सहकार क्षेत्रातील अधिकारी, भारतीय रिझर्व बँकेचे अधिकारी,पिग्मी प्रतिनिधी व कर्मचारी यांचा खूप मोठा वाटा असल्याचे नमूद केले. बँकेचे वरिष्ठ अधिकारी सुशिल जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
