सृजन राज्यस्तरीय माऊली वेशभूषा स्पर्धेचा निकाल जाहीर

0
सृजन राज्यस्तरीय माऊली वेशभूषा स्पर्धेचा निकाल जाहीर

सृजन राज्यस्तरीय माऊली वेशभूषा स्पर्धेचा निकाल जाहीर

आषाढी एकादशी निमित्ताने सृजन संस्थेने केले स्पर्धेचे आयोजन
अहमदपूर (गोविंद काळे) : सृजन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून आषाढी एकादशी या दिनाचे औचित्य साधून ऑनलाईन राज्यस्तरीय वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे ऑनलाईन निकाल घोषित करण्यात आला.
आषाढी एकादशी म्हटले की, डोळ्यांसमोर येते, ती पंढरपूरची वारी! वारी करत आषाढी एकादशीला पंढरपुरातील विठ्ठलाचे दर्शन घेणे हा लाखो वारकऱ्यांना दरवर्षीची नियम असतो. राज्यभरातील संतांच्या पालख्या नियोजित वेळेस ठिकठिकाणाहून निघून आषाढी एकादशीला पंढरपुरात पोहोचतात. ‘बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ॥’ या अभंगाची प्रचीती प्रत्येक वारकरी आणि विठ्ठल भक्त घेत नित्यनेमाने घेत असतो. पंढरीचा विठ्ठल हा वारकऱ्यांचा श्वासच आहे. त्याच्या नामाविना त्यांचे कोणतेच कर्म होत नसते. अशा भगवद्भक्त असलेल्या वारकऱ्यांचा महासंगम पंढरपूर यात्रेच्या म्हणजेच वारीच्या निमित्ताने होत असतो.या दिनाचे औचित्य ठेवून माऊली राज्यस्तरीय वेशभुषा स्पर्धेचे आयोजन करुन यशस्वीपणे स्पर्धा राबविण्यात आले.
सृजन संस्थेतर्फे मागिल काळात अनेक उपक्रम राबविण्यात आले असून सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील या स्पर्धेत बहुमोल प्रतिसात मिळाला.अशी माहिती सचिव महादेव खळुरे यांनी यावेळी माहिती दिली.राज्यस्तरीय माऊली वेशभूषा स्पर्धेचे दोन गटात आयोजन केले होते.
यामध्ये वय वर्ष १ ते ७ वर्ष व ८ ते १२ वर्ष असे दोन्हीही गटाचा खालील प्रमाणे निकाल घोषित करण्यात आला. लहान गटात सर्व प्रथम- पठाण फातेमा अझरुद्दीन, द्वितीय-कुलकर्णी श्रीषा आशिषराव,द्वितीय- टेकाळे ओवी विशाल,तृतीय- बोधणे नंदिनी चंद्रकांत,तृतीय- कवडे श्रवण दत्ता यांची निवड झालेली आहे. तर वय वर्ष ८ ते १२ वर्षाच्या गटातून सर्व प्रथम- पोन्नमवार सुदिक्षा ज्ञानेश्वर,द्वितीय-पदातुरे सात्विक कमलाकर,तृतीय-दिंडे इश्वरी शिवाजी,तृतीय-हासुळे नेहा बालाजी या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. राज्यस्तरीय माऊली वेशभूषा स्पर्धेत राज्यातून शेकडो विद्याथ्यर्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेचे निकाल यूटूब चॅनेलच्या माध्यमातून ऑनलाईन घोषित करण्यात आला. स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना फोन पे द्वारे रोख रक्कम व गुणवंत विद्यार्थ्यांना तसेच सहभागी सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन ई-सर्टिफिकेट देऊन गौरव करण्यात आले. वरील स्पधेर्साठी,किरण खमितकर,गणेश मुसळे,रविकुमार रणभिडकर,मल्लपा खळुरे, पद्मा कळसकर,परमेश्वर खळुरे आदिनी परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!