अंजुम पठाण सेट परीक्षा उत्तीर्ण
अंजुम पठाण सेट परीक्षा उत्तीर्ण
उदगीर (एल.पी.उगीले) : तालुक्यातील एकुर्का रोड येथील रहिवाशी अंजुम रसूल पठाण हि सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे तर्फे ७ एप्रिल २०२४ रोजी घेण्यात आलेल्या सहाय्यक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परिक्षा (सेट) उत्तीर्ण झाली आहे.
अंजुम पठाण हिचे प्राथमिक शिक्षण एकुर्का रोड येथील जि. प. प्रा. शाळा व समर्थ विद्यालयात झाले असून माध्यमिकचे शिक्षण विद्यावर्धिनी हायस्कूल उदगीर येथे झाले आहे. उच्च माध्यमिक व बी. एस्सी. चे शिक्षण शिवाजी महाविद्यालय, उदगीर येथे झाले. तर नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून रसायनशास्त्र या विषयात एम. एस्सी. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण आहे. सेट परिक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
