काँग्रेस पक्षात इनकमिंग वाढली, भाजप राष्ट्रवादीचे युवा नेते काँग्रेसमध्ये
काँग्रेस पक्षात इनकमिंग वाढली, भाजप राष्ट्रवादीचे युवा नेते काँग्रेसमध्ये
उदगीर (एल. पी. उगीले) : विधानसभा निवडणुका जशा जशा जवळ येऊ लागल्या आहेत, समाजवादी विचारधारेच्या महाविकास आघाडीकडे युवक आकर्षित होऊ लागले आहेत. विशेष करून काँग्रेस पक्षाकडे तरुणांचा ओढा वाढला आहे. उदगीर तालुक्यातील अनेक युवकांनी
महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, ज्येष्ठ नेते, सहकारमहर्षी दिलीपरावजी देशमुख यांच्या हस्ते, उदगीर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कल्याण पाटील यांच्या पुढाकाराने उदगीर तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला.यात राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार) गटाचे ओबीसी जिल्हाध्यक्ष लक्ष्मण बतले, पंचायत समितीचे माजी सभापती उद्धव गंभीरे, लोहारा येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल रक्षाळे, भाजप युवा मोर्चाचे विजय हेळगे, प्रा.सचिन वाघमारे, प्रा. संतोष चौधरी, प्रशांत हुडगे, प्रा. सुगावकर , मुन्ना सूर्यवंशी यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी माजी पालकमंत्री आ.अमित देशमुख व लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन तथा आ.धीरजभैय्या देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
या वेळी महिला काँग्रेसच्या प्रदेश सचिव उषाताई कांबळे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य ऊटगे, उदगीर विधानसभा निरीक्षक रवींद्र काळे, बाजार समितीचे सभापती शिवाजी हुडे, पंडीत ढगे,श्रीकांत पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती ज्ञानोबा गोडभरले, तालुका काँग्रेस कमिटीचे मीडिया सेल प्रमुख चेअरमन विवेक जाधव, पंचायत समितीचे माजी सदस्य बबन धनबा, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रवीण बिरादार, तालुका उपाध्यक्ष विपिन जाधव, लोहारा विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन शेषराव हेळगे यांच्यासह उदगीर तालुका काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
