उदयगिरीच्या बुद्धिबळ संघास उपविजेतेपद
उदयगिरीच्या बुद्धिबळ संघास उपविजेतेपद
उदगीर (एल.पी.उगीले) : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड अंतर्गत उज्वल ग्रामीण महाविद्यालय, घोणसी येथे आंतर महाविद्यालयीन ब- विभाग बुद्धिबळ (पुरुष) स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या खेळाडूंनी सक्रिय खेळ दाखवीत ‘उपविजेतेपद’ (द्वितीय क्रमांक) पटकाविला आहे. विजेत्या संघामध्ये खर्डेकर सुरज, चोले नरसिंग, बिबिनवरे व्यंकटरमण, जाधव नंदन, बुरसे हरिओम, सुर्यवंशी चिमण या खेळाडूंचा समावेश होता. विजयी खेळाडूंना क्रीडा संचालक प्रा. सतिश मुंढे, प्रा. रोहन येनाडले यांनी मार्गदर्शन केले. त्याबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी, उपाध्यक्ष डॉ.रेखा रेड्डी, सचिव रामचंद्र तिरुके, सहसचिव अॅड.एस.टी.पाटील चिघळीकर आणि डॉ.रामप्रसाद लखोटिया, कोषाध्यक्ष भालचंद्र चाकूरकर तसेच सर्व संस्था सदस्य, प्राचार्य डॉ.आर.के.मस्के, उपप्राचार्य डॉ.एस.जी.पाटील आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
