शिवाजी महाविद्यालयाचे बुद्धिबळ स्पर्धेत यश
शिवाजी महाविद्यालयाचे बुद्धिबळ स्पर्धेत यश
उदगीर (एल.पी.उगीले) : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या “ब ” झोन बुद्धिबळ (पुरुष )अंतर महाविद्यालयीन स्पर्धा उज्वल ग्रामीण महाविद्यालय घोनसी येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. सदर स्पर्धेत शिवाजी महाविद्यालयाच्या पुरुषांच्या संघाने तृतीय स्थान प्राप्त केले.संघाचा कर्णधार कोयलवार सक्षम , गिरी अवधूत, कुलकर्णी श्रीकांत , मोरे सुरज , सावंत सिद्धार्थ व कुंभार मल्लिकार्जुन यांच्या समावेश होता. सर्व खेळाडूंनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले. प्राचार्य डॉ. अरविंद नवले खेळाडूंना नेहमी प्रोत्साहित करणारे किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर , सचिव पी टि शिंदे , कौषाध्यक्ष गुंडेराव पाटील , महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. आर. एम. मांजरे,कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. विलास भोसले, पर्यवेक्षक प्रा. जी. जी. सूर्यवंशी, शिक्षक वृंद, खेळाडू व कर्मचारी यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. क्रीडा संचालक प्रा. नेहाल अहेमद ,प्रा. गजानन माने यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले.
