महात्मा फुले महाविद्यालयात ॲड. सी. पी. पाटील यांना अभिवादन

0
महात्मा फुले महाविद्यालयात ॲड. सी. पी. पाटील यांना अभिवादन

महात्मा फुले महाविद्यालयात ॲड. सी. पी. पाटील यांना अभिवादन

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात किसान शिक्षण प्रसारक मंडळ, उदगीरचे माजी सचिव तथा ज्येष्ठ विधीज्ज्ञ स्वर्गीय ॲड. सी. पी. पाटील यांना आठव्या पुण्यस्मरणानिमित्त अभिवादन करण्यात आले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महाविद्यालयाची प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या स्वर्गीय ॲड. सी.पी. पाटील यांचा स्मृतिदिन तसेच ऑगस्ट क्रांती दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी होते तर प्रोफेसर डॉ. अनिल मुंढे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ॲड. सी. पी. पाटील साहेब यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या सर्व हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले तर आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. पांडुरंग चिलगर यांनी मानले. यावेळी प्रो. डॉ. अभिजीत मोरे , डॉ. प्रशांत बिरादार, डॉ. सचिन गर्जे, प्रशांत डोंगळीकर, अजय मुरमुरे, चंद्रकांत धुमाळे, वामनराव मलकापूरे, शिवाजी चोपडे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!