यशवंत विद्यालयातील योग शिक्षक गौरव चवंडा यांची असोसिएट् एन.सी.सी.ऑफिसर् म्हणून निवड
यशवंत विद्यालयातील योग शिक्षक गौरव चवंडा यांची असोसिएट् एन.सी.सी.ऑफिसर् म्हणून निवड
अहमदपूर (गोविंद काळे) : यशवंत विद्यालयातील सहशिक्षक तथा योगशिक्षक गौरव चवंडा यांची यशवंत विद्यालयात एन सी सी ऑफिसर म्हणून निवड करण्यात आली आहे. या समयी कमांडिंग ऑफिसर कर्नल हेमंत जोशी , लेफ्टनंट कर्नल वाय बी सिंग ,सुभेदार मेजर शंभू सिंग,संपूर्ण पीआय स्टाफ, मुख्यालिपीक एस बी घोगरे, बी एम पवार यांच्याशी मान्यवरांची उपस्थिती होती.
या यशाबद्दल त्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अशोक सांगवीकर, सचिव शिक्षण महर्षी डी बी लोहारे गुरुजी, मुख्याध्यापक गजानन शिंदे, उपमुख्याध्यापक माधव वाघमारे, पर्यवेक्षक राम तत्तापुरे, शिवाजी सूर्यवंशी यांच्या सह शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन आणि कौतुक केले आहे.
