शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिरूर ताजबंद येथे सदस्य नोंदणीस उत्तम प्रतिसाद
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिरूर ताजबंद येथे सदस्य नोंदणीस उत्तम प्रतिसाद
विधानसभा मतदारसंघात पन्नास हजार सदस्य नोंदणी करणार – जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी
अहमदपुर (गोविंद काळे) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक शिरूर ताजबंद येथे सदस्य नोंदणीस उत्तम प्रतिसाद मिळाला. शिवसेना सदस्य नोंदणी कार्यक्रमास शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख तथा माजी आमदार रोहिदासजी चव्हाण साहेब, जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, विधानसभा संपर्क प्रमुख मुर्गेश पिलई, युवा सेना जिल्हाप्रमुख लक्ष्मण पेटकर, उपजिल्हा प्रमुख भारत सांगवीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्र राज्यात शिवसेना सदस्य नोंदणी कार्यक्रम राबविण्यात येत आहे.त्याचा एक भाग म्हणून अहमदपुर तालुक्यातील आठवडी बाजारामध्ये शिवसेना सदस्य नोंदणी करण्याचे आयोजन करण्यात येतं आहे. सोमवारी अहमदपुर शहर, मंगळवारी हाडोळती, बुधवारी किनगाव तर गुरुवारी शिरुर तांजबंद येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना सदस्य नोंदणी करण्यात आली. या सदस्य नोंदणीस उत्तम प्रतिसाद मिळाला. चार दिवसात सहा हजार सातशे तेरा सदस्यांनी सहभाग नोंदवून उत्स्फूर्तपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या खंबिरपणे पाठीशी उभे राहून पुन्हा एकदा मुख्यमंत्री करण्यासाठी पुढाकार घेऊन काम करु असे सांगितले.या सदस्य नोंदणीस वयोवृद्ध, महिला,युवकांनी उदंड प्रतिसाद दिला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांनी सांगितले की, तालुक्यातील प्रत्येक शाखेच्या माध्यमातून गाव खेड्यात, वाडी तांड्यावर, माध्यमिक , उच्च माध्यमिक विद्यालयात शिवसेना सदस्य नोंदणी अभियान राबवून पन्नास हजार शिवसेना सदस्य नोंदणी करण्यात येणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या प्रत्येक आदेशाचे पालन करुन गोर गरीब जनतेला मदत करण्यासाठी सदस्य नोंदणी ओळखपत्रावर माझा नंबर दिला आहे, अडचणीच्या काळात माझ्याशी संपर्क केल्यास सहकार्य करणार असल्याचे सांगितले.
सदस्य नोंदणी अभियान यशस्वी करण्यासाठी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख तथा माजी आमदार रोहिदास चव्हाण जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, उपजिल्हा प्रमुख भारत सांगवीकर, विधानसभा समन्वयक प्रकाश हैबतपुरे तालुका प्रमुख विलास पवार हंगरगेकर, शहर प्रमुख शिवा कासले, तालुका संघटक प्रा.संतोष रोडगे सर,नगरसेवक संदीप चौधरी,उपतालुका प्रमुख अनिकेत फुलारी, गणेश माने, दत्ता हेंगणे, लहू बारवाड, अनिल लामतुरे,संतोष आदटराव, उपशहरप्रमुख शिवकुमार बेद्रे, कार्यालय प्रमुख सुभाष गुंडीले, सहसचिव पद्माकर पेंढारकर,शिवा भारती, तिरुपती पाटील,कालिदास धुळगुंडे, गजानन येन्ने, संजय बुरुसपट्टे, श्रीकांत केंद्रे, सुधाकर बालवाड, अजय सुरनर, सिद्धेश्वर औराळे, गणेश राठोड, सोमनाथ आढाव, सुरेश अंकुलगे, तानाजी वाघमारे, दत्ता कदम, विजय ढाकणे, धनंजय तुडमे यांनी परिश्रम घेतले.
