इनर व्हील क्लब च्या वतीने स्तनपान सप्ताह साजरा

0
इनर व्हील क्लब च्या वतीने स्तनपान सप्ताह साजरा

इनर व्हील क्लब च्या वतीने स्तनपान सप्ताह साजरा

अहमदपूर (गोविंद काळे) : इनर व्हील क्लबच्या वतीने ग्रामीण रुग्णालय अहमदपूर येथे नवजात बालकाच्या व मातेच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून स्तनपानाचे महत्त्व व महिलांमध्ये जागृती व्हावी म्हणून स्तनपान सप्ताह साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी विजया भुसारे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ.वर्षा भोसले, ग्रामीण रुग्णालयाच्या स्पेशल मेडिकल ऑफिसर डॉ. नेहा पाटील उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या प्रारंभी स्तनदा मातांना सकस आहाराचे पॅकेट, फळं, प्रोटीन पावडर देण्यात आले.
डॉ. वर्षा भोसले व डॉ.नेहा पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनातून आईचे पहिले दुध म्हणजे बाळासाठी अमृता समान असते.त्यामुळे बाळ निरोगी व सुदृढ राहते. सहा महिन्यापर्यंत बाळाला फक्त आईचे दूधच द्यावे.स्तनपान केल्यामुळे आईचे आरोग्य पण चांगले राहते असे मत व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोप विजया भुसारे यांनी केला. प्रास्ताविक व सूत्रसंचालन कलावती भातांब्रे यांनी केले तर आभार पुजा रेड्डी यांनी मानले.
यावेळी मुख्याध्यापिका दर्शना हेंगणे, माजी अध्यक्षा सुनीता गुणाले, ज्योती जाधव, जया बिरादार, संगीता मेनकुदळे सह सदस्या उपस्थित होत्या.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रवीणा पाटील, बुसूम सिस्टर, पडीले सिस्टर, जाधव सिस्टर, ढाके सिस्टर सह ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!