विधानसभेसाठी मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन, लाभ घेण्याचे उपविभागीय अधिकारी शिंदे यांचे आवाहन

0
विधानसभेसाठी मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन, लाभ घेण्याचे उपविभागीय अधिकारी शिंदे यांचे आवाहन

विधानसभेसाठी मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन, लाभ घेण्याचे उपविभागीय अधिकारी शिंदे यांचे आवाहन

उदगीर (एल पी उगिले) : उदगीर विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव मतदारसंघ असून या मतदारसंघात तीन लाख 14 हजार मतदार आहेत. तसेच ज्या मतदारांचे वय 18 वर्षे झाले आहे, मात्र ज्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही. अशा नव मतदारांसाठी उदगीर विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रावर 10 आणि 11 तसेच 17 आणि 18 या शनिवार आणि रविवारी मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या वेळी संबंधित यादी विभागाचे बी एल ओ त्यांचे अधिनस्त यादी भागातील मतदान केंद्रावर उपस्थित राहणार आहेत. या शिबिराचा लाभ उदगीर व जळकोट तालुक्यातील सर्व नागरिकांनी घ्यावा, व या कालावधीमध्ये जास्तीत जास्त मतदार नोंदणी करण्याचे आवाहन उदगीरचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांनी केले आहे.
उदगीर विधानसभा मतदारसंघात सध्या तीन लाख 14 हजार 191 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदार संघात यापूर्वी 336 मतदान केंद्र होती. 1350 मतदार संख्येच्या वर असलेल्या 23 मतदान केंद्राची विभागणी करून 23 मतदान केंद्राची नवीन निर्मिती करण्यात आलेली आहे. 23 नवीन मतदान केंद्रापैकी उदगीर तालुक्यातील 19 नवीन मतदान केंद्राची निर्मिती तसेच जळकोट तालुक्यामध्ये चार असे एकूण 23 मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आलेली आहे.
उदगीर मतदार संघात एकूण 359 मतदान केंद्राची संख्या झालेली आहे. उदगीर विधानसभा मतदारसंघात पुरुष मतदार एक लाख 64 हजार 60 तर महिला मतदार एक लाख 50 हजार 114 तसेच तृतीयपंथी सतरा मतदारांनी नोंदणी केलेली आहे. या पद्धतीने एकूण तीन लाख 14 हजार 191 मतदारांची संख्या आहे. येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने राज्यात यावर्षी दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाची घोषणा केली आहे. त्या अनुषंगाने पात्र नव मतदारांची मतदार नोंदणी करून घेणे आणि विधानसभा निवडणुकीआधी राज्याची अद्यावत मतदार यादी तयार करणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. निवडणूक आयोगाने एक ऑगस्ट 2024 रोजी एका पत्राद्वारे मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षणचा दुसरा कार्यक्रम पुन्हा सुधारित केलेला आहे. या पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी 6 ते 20 ऑगस्ट असा आहे. उदगीर विधानसभा मतदारसंघात यापूर्वी 336 मतदान केंद्र होती. 1350 मतदार संख्येच्या वर असलेल्या 23 मतदान केंद्राची विभागणी करून 23 मतदान केंद्राची नवीन निर्मिती करण्यात आली आहे. या वाढीव मतदान केंद्रासोबतच या दुसऱ्या मतदार नोंदणी शिबिराच्या दरम्यान मतदार संख्या आणखी वाढल्यास मतदान केंद्र वाढू शकतात. अशी शक्यता वर्तवली जात आहे. या मतदार नोंदणी शिबिराचे जास्तीत जास्त नव मतदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!