जिल्हा बँकेचा “ब्रांच ऑन व्हील्स” उपक्रम कौतुकास्पद – विवेक जाधव

0
जिल्हा बँकेचा "ब्रांच ऑन व्हील्स" उपक्रम कौतुकास्पद - विवेक जाधव

जिल्हा बँकेचा "ब्रांच ऑन व्हील्स" उपक्रम कौतुकास्पद - विवेक जाधव

उदगीर (एल. पी. उगिले) : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने अनेक लोक कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. त्यासोबतच बँकेच्या वतीने लाभार्थ्यांना घरपोच लाभ मिळावा, अशा उदात्त हेतूने सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आ. धीरज देशमुख यांनी नागपंचमीच्या शुभ मुहूर्तावर बँकेच्या ब्रांच ऑन व्हील्स उपक्रमांतर्गत उदगीर तालुक्यातील भाकसखेडा आणि गंगापूर येथे गावात जाऊन व्हन द्वारे पैसे वाटप करण्यात आले. ही अत्यंत कौतुकास्पद आणि लोककल्याणाची भावना असलेली योजना असल्याचे मत गंगापूर आणि भाकसखेडा विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन विवेक पंडितराव जाधव यांनी व्यक्त केले.
ग्रामीण भागातील अनेक गावात जिल्हा बँकेच्या शाखा नसल्यामुळे, शेतकरी आणि विविध योजनेच्या लाभार्थ्यांना जवळ असलेल्या मोठ्या गावातील बँक शाखेत जाऊन पैसे काढावे लागतात. त्यासाठी खातेदारांची आणि लाभार्थ्यांची होणारी गैरसोय विचारात घेऊन बँकेने विविध योजना राबवल्या आहेत. विशेषतः पावसाळ्यामध्ये अनेक गावचे रस्ते खराब झाले आहेत. तसेच गोरगरिबांना अनावश्यक खर्चही परवडत नाही. या सर्व गोष्टीचा विचार करून बँकेने लोककल्याणाच्या केलेल्या घोषणेप्रमाणे शेतकऱ्यांचा पीक कर्जाचे व्याज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले होते, तसेच संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजनेचे अनुदान ही जमा झाल्याने सर्व लाभार्थ्यांना गावातच पैसे मिळाल्याने त्यांची गैरसोय दूर झाली आहे. सर्वसामान्य माणसाच्या मनातील भावना ओळखून राबवलेल्या या उपक्रमाचे भाकसखेडा आणि गंगापूर विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन विवेक पंडितराव जाधव यांनी कौतुक केले असून बँकेचे चेअरमन धीरज देशमुख, बँकेच्या संचालिका लक्ष्मीताई चंद्रशेखर भोसले तसेच मार्गदर्शक सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचे आभारही व्यक्त करण्यात आले आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!