स्तनपान हे आई व बाळाच्या विकासासाठी उपयुक्त – डॉ. सुलोचना येरोळकर
स्तनपान हे आई व बाळाच्या विकासासाठी उपयुक्त - डॉ. सुलोचना येरोळकर
स्तनपान आठवडानिमित्त जनजागृती : उदगीर रोटरीचा उपक्रम
उदगीर (एल.पी.उगीले) : स्तनपानाने बाळाचा सर्वांगीण विकास अन् माताही निरोगी राहते. असे प्रतिपादन डॉ. सुलोचना येरोळकर यांनी केले.
स्तनपान आठवडानिमित्त येथील शासकीय सामान्य रुग्णालयात रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल व सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्तनपानाविषयी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला, याप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी रोटरी क्लबच्या अध्यक्षा सरस्वती चौधरी यांनी रोटरी क्लबच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांबद्दल माहिती दिली. कार्यक्रमास रोटरीचे उपाध्यक्ष रविंद्र हसरगुंडे, सचिव ज्योती चौधरी, वैद्यकीय अधीक्षक डॉ.मेघश्याम कुलकर्णी, बाह्यसंपर्क निवासी अधिकारी डॉ. मोनिका पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शशिकांत देशपांडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती सोनावणे,डॉ. राणी कदम, डॉ. नागेश स्वामी, आहारतज्ञ अपूर्वा कांबळे, श्रीमती माणकोळी, मेट्रॉन
श्रीमती सोनकांबळे, श्रीमती कांबळे सह रोटरीचे डॉ. संतोष पांचाळ, संतोष फुलारी उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. सुलोचना येरोळकर यांनी, आईचे दूध हे निर्जंतुक असते. त्यामुळे बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढते,स्तनपानामुळे बाळाचा बौद्धिक,
शाररिक आणि मानसिक विकास तर होतोच शिवाय मातेच्या स्तनकर्करोगालाही आळा बसतो, पहिले
स्तनपान करतानाचे दूध हे प्रथिनेयुक्त असते. यामुळे बाळाची वाढ तर होतेच शिवाय बौद्धिक विकासासाठीही हे
खूप महत्त्वाचे असते असे सांगितले. कार्यक्रमात उपस्थित मातांना प्रोटीन पावडर देण्यात आले. यासाठी मॅनकाईन्ड फार्माचे कृष्णकांत पाटोदे यांनी योगदान दिले. सुत्रसंचालन विशाल जैन यांनी केले. आभार ज्योती चौधरी यांनी मानले.
