भगव्या सप्ताह निमित्त मोफत नेत्र चिकित्सा तथा शस्त्रक्रिया शिबिर संपन्न
भगव्या सप्ताह निमित्त मोफत नेत्र चिकित्सा तथा शस्त्रक्रिया शिबिर संपन्न
उदगीर (एल पी उगिले) : तालुक्यातील मौजे दावणगाव येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त “भगवा साप्ताह” निमित्त शिवसेना उदगीर आणि उदयगिरी लॉयन्स धर्मदाय नेत्र रुग्णालयात यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर तसेच शिवसेना सदस्य नोंदणी कार्यक्रम घेण्यात आला. हा कार्यक्रम जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विधानसभा संपर्कप्रमुख देवेंद्र भाऊ कांबळे यांच्या हस्ते उद्घाटन करून अभियान संपन्न झाले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख अंकुश कोनाळे,तालुकाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल, शहरप्रमुख अनिल पंचाक्षरी,डॉ.प्रशांत गायकवाड,डॉ.गणेश जोगदंड व उदयगिरी लॉयन्स रुग्णालयाचे कर्मचारी संयोजक महेश फुले, शिवसेना उपतालुकाप्रमुख मनोज फुले,वसंत जाधव,अंकुश हुरुसनाळे,गोविंद हंगरगे,अरविंद भंडे,वेंकट महापुरे, विनेश मोटे,श्याम नितंगे,जयेंद्रत चव्हाण,रसिंग कांबळे,भागवत फुले,ज्ञानेश्वर फुले, ओम फुले,प्रदीप पाटील,गोविंद जाधव,गणेश फुले, विनोद फुले,श्रीकांत जाधव,राहुल जाधव, गजानन फुले,दिनकर बिरादार, शरद फुले, हणमंत भोळे आणि रुग्णाची उपस्थितीत होते.
