मल्लिकार्जुन कुंभार यांच्यावर अ.भा. कुंभार प्रजापती राजकीय फेडरेशनची महाराष्ट्रासह 6 राज्याची जबाबदारी

0
मल्लिकार्जुन कुंभार यांच्यावर अ.भा. कुंभार प्रजापती राजकीय फेडरेशनची महाराष्ट्रासह 6 राज्याची जबाबदारी

मल्लिकार्जुन कुंभार यांच्यावर अ.भा. कुंभार प्रजापती राजकीय फेडरेशनची महाराष्ट्रासह 6 राज्याची जबाबदारी

उदगीर (एल. पी. उगिले) : अखिल भारतीय कुंभार प्रजापती राजकीय फेडरेशन या सामाजिक संघटनेच्या वतीने समाजाचे राजकीय पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने समाजातील कर्तबगार नागरिकांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे जबाबदारी देण्यात आली आहे. यामध्ये प्राधान्याने मल्लिकार्जुन कुंभार यांना महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा,केरळ, तामिळनाडू या सहा राज्यामध्ये प्रभारी पद देऊन त्यांचा गौरव केला आहे. तसेच कर्नाटक राज्याच्या संयोजक पदी ही त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुंभार समाज हा विखुरलेला आहे. या समाजातील अनेक कर्तबगार असलेल्या व्यक्तींना देखील राजकीय संधीचा लाभ मिळत नाही, अशा कर्तबगार व्यक्तींना राजकीय संधीचा लाभ मिळावा. या दृष्टीने समाज जागृती सोबत कर्तबगार व्यक्तीचे कौशल्य विविध राजकीय पक्ष संघटनाच्या नजरेस आणून देऊन त्यांचा आणि राजकीय पक्षांचा समन्वय घडवून आणून समाजाचे कार्य करावे. अशी अपेक्षा मल्लिकार्जुन कुंभार यांच्याकडून अखिल भारतीय कुंभार प्रजापती राजकीय फेडरेशनचे संस्थापक संचालक सत्यनारायण प्रजापती यांनी व्यक्त केली आहे. समाजातील विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेले व्यक्ती राजकीय क्षेत्रात देखील सक्रिय होऊ इच्छित असतील, मात्र त्यांना उमेदवारी मिळत नसेल तर ती मिळवून देण्यासाठी योग्य ते सहकार्य करावे, तसेच प्रदेश निहाय संयोजकांना संपर्क साधून त्यांच्याशी समन्वय करून राजकीय पक्षांमध्ये समाज बांधवांची भागीदारी राहिली पाहिजे, या दृष्टीने कार्य करावे. अशी अपेक्षा नियुक्ती पत्रात व्यक्त केली आहे.
या मोठ्या जबाबदारीच्या नंतर समाज बांधवांच्या वतीने मल्लिकार्जुन कुंभार यांचा सत्कार आणि कौतुक सोहळा ही घेण्यात आला. याप्रसंगी बोलताना मल्लिकार्जुन कुंभार यांनी सांगितले की, समाजाची सेवा करण्याची ही मोठी संधी मला अखिल भारतीय कुंभार प्रजापती राजकीय फेडरेशनने दिली आहे. याची जाणीव ठेवून सकारात्मक दृष्टीने समाजकार्यासाठी मी सदैव तत्पर राहीन अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!