राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा संधर्भात नियोजन बैठक

0
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा संधर्भात नियोजन बैठक

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा संधर्भात नियोजन बैठक

उदगीर (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्याच्या पहिल्या पायरीचे दर्शन घेऊन महाराष्ट्रात रयतेचे राज्य आणण्याचा निर्धार करत आदरणीय शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा सुरू झाली आहे. महाराष्ट्रावर होत असलेला अन्याय आणि. महाराष्ट्राविरुद्ध रचण्यात आलेला कट लोकांसमोर आणण्याचं काम या यात्रेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. या शिवस्वराज्य यात्रा दि.१४/०८/२०२४ वार: बुधवार रोजी आपल्या उदगीर मतदार संघात शिवस्वराज्य यात्रेचे आगमन होणार आहे. या संधर्भात सविस्तर विचार विनिमय करून कार्यक्रमाचे नियोजन व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी,जिल्हा पदाधिकारी,उदगीर तालुका व शहरातील सर्व सेलचे पदाधिकारी,जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य,कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य,नगर परिषद सदस्य व शरदचंद्र पवार साहेबावर प्रेम करणारे निष्ठावंत कार्यकर्त्याची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.या बैठकीचे आयोजन रायगड निवास,लाल बहादुर प्राथमिक शाळेच्या समोर,खादी ग्रामोद्योगच्या बाजूस,उदगीर दिनांक: १०/०८/२०२४वेळ: सकाळी १०:०० वाजता. करण्यात आले आहे.तरी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष,उदगीर च्या वतीने करण्यात आले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!