विद्यार्थ्यांनी हेलन केलर यांचा आदर्श घ्यावा – मोगेकर
विद्यार्थ्यांनी हेलन केलर यांचा आदर्श घ्यावा - मोगेकर
आर आर कोचिंग क्लासेस येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
अहमदपूर ( गोविंद काळे ) : हेलन किलर या एक अमेरिकन लेखिका व शिक्षक होत्या त्या अंध आणि बहिरे असुनही त्यांनी शिक्षण आणि प्रशिक्षण या अपंग व्यक्तींच्या शिक्षणात एक विलक्षण कामगिरी केलेली असून यांचा विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा, असे बीआरसी चे अंध कर्मचारी मोगेकर यांनी सांगितले.
ते अहमदपूर येथील संतोष रोडगे यांच्या आर आर कोचिंग क्लासेस मध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतेवेळी बोलत होते. पुढे बोलताना मोगेकर म्हणाले की, हेलन केलरचा शैक्षणिक प्रवास ही चिकाटी आणि प्रतिकूलतेवर विजय मिळवण्याची उल्लेखनीय असून इतर असंख्य लोकांना त्यांनी प्रेरणा दिली आहे आणि अपंग लोकांसाठी शिक्षणाच्या क्षेत्रावर कायमस्वरूपी प्रभाव टाकला आहे. अपंग लोकांसाठी, त्यांच्या हक्कांसाठी आणि चांगल्या राहणीमानासाठी योगदान दिले आहे.
हेलर यांनी पंचवीस वेगवेगळ्या देशांमध्ये प्रवास करून एक विपुल लेखन केले होते, त्या विविध विषयांवर 14 पुस्तके आणि शेकडो भाषणे आणि निबंध लिहिले असून एक अंध व बहिरे व्यक्ति अंधत्वावर व बहिरेपणावर मात करून डोळस व्यक्तीला लाजवेल असे कार्य केलेले महान व्यक्ती हेलन केलर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी सतत अभ्यासात मग्न राहून नावलौकिक करावा असेही यावेळी मोगेकर म्हणाले.यावेळी विद्यार्थी उपस्थित होते.
