संत ज्ञानेश्वर विद्यालयात विद्यार्थी संसदेची निवड
संत ज्ञानेश्वर विद्यालयात विद्यार्थी संसदेची निवड
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात क्रांती दिनानिमित्त हरघर तिरंगा ची विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली.तसेच शालेय मंत्रिमंडळाची लोकशाही पद्धतीने निवडणूक घेण्यात आली. विद्यार्थी संसद सचीव पदी नोमान शेख तर अध्यक्षपदी स्वराज मोरे यांची निवड झाली.
उपाध्यक्ष संस्कृती मलशेट्टे, शिक्षण मंत्री सोहम फुलारी, क्रीडामंत्री प्रितम वाघमारे व वंदना ढवळे, पर्यावरण मंत्री अर्णव शेटकर ,सांस्कृतिक मंत्री अल्तमश शेख ,आरोग्य मंत्री कार्तिक हेंगणे ,शिस्त मंत्री प्रणव गायकवाड, सहल मंत्री श्रेयश मुसळे, अन्नमंत्री गणेश सोनवणे,स्वच्छता मंत्री आनंदी नारागुडे यांची निवड झाली .निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सतीश साबणे,नंदकुमार
मद्देवाड, युवराज मोरे, मीर सय्यद, सविता पाटील यांनी काम पाहिले.या यशस्वी विद्यार्थ्याचे कौतुक संस्थाध्यक्ष गणेश दादा हाके पाटील ,संस्था सचिव प्राचार्या रेखाताई तरडे, उपाध्यक्षा एडवोकेट मानसी हाके, मुख्याध्यापिका आशा रोडगे, मुख्याध्यापिका मीना तोवर सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.
