मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अध्यक्षपदी बालाजी भोसले यांची निवड

0
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अध्यक्षपदी बालाजी भोसले यांची निवड

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अध्यक्षपदी बालाजी भोसले यांची निवड

उदगीर (एल.पी.उगीले) : मुख्यमंत्री “ माझी लाडकी बहीण “ योजना उदगीर विधानसभा क्षेत्रनिहाय समिती अध्यक्षपदी लातूर जिल्हयाचे पालकमंत्री यांच्या शिफारसीने व महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. संजयजी बनसोडे यांच्या सूचनेवरून हंडरगुळीचे सुपुत्र उदगीर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बालाजी विनायकराव भोसले पाटील यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड झाल्याबद्दल त्यांचा हंडरगुळी मध्ये सत्कार करण्यात आला. यावेळी सोसायटीचे चेअरमन संग्रामजी भोसले , सरपंच विजयकुमार अंबेकर , उदगीर भाजपा तालुकाध्यक्ष शिवशंकर धूप्पे, बालासाहेब शेटकार गुरुजी,ग्रा.प. सदस्य सुनिल कांबळे, युसुफ शेख, नितीन भोसले पाटिल , राजकुमार चौकटे , बसवराज धूप्पे ,उमाकांत शेटकार,नागनाथ झोले, राजकुमार डोके, रामू कांबळे, मुनीर शेख,लाला कुरेशी , शादुल शेख इ मित्र परिवार उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना बालाजी भोसले म्हणाले की, महायुतीच्या नेत्यांनी आणि उदगीर विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते ना. संजय बनसोडे यांनी माझ्यावर विश्वास टाकून मोठी जबाबदारी दिली आहे. याची जाण ठेवून सर्वांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न या योजनेच्या माध्यमातून केला जाईल. कोणावरही अन्याय होणार नाही. नेत्यांनी ज्या विश्वासाने ही संधी दिली आहे. त्या संधीचे सोनं करून समाजसेवेचा वसा म्हणून या समितीमध्ये सक्रिय राहून काम करेन, असे आश्वासन याप्रसंगी बालाजी भोसले यांनी दिले. आपल्या गावच्या कर्तबगार युवकाला ही संधी मिळाल्याबद्दल गावामध्ये जल्लोष साजरा केला जात होता. तालुक्यातील सर्व युवक आघाडीच्या वतीने बालाजी भोसले यांचे कौतुक आणि अभिनंदन केले जात आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!