बॅडमिंटन स्पर्धेत समर्थ विद्यालयाचा संघ प्रथम

0
बॅडमिंटन स्पर्धेत समर्थ विद्यालयाचा संघ प्रथम

बॅडमिंटन स्पर्धेत समर्थ विद्यालयाचा संघ प्रथम

उदगीर (एल.पी.उगीले) : तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत एकुर्का रोड येथील समर्थ विद्यालयाचा संघ १७ वर्ष वयोगटात प्रथम आला आहे.
उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा पार पडल्या. यात समर्थ विद्यालयाचे मृणाल नितीन पोद्दार, दिव्यांका अमोल भोसले, श्रुती गोविंद रंदवे, रूपाली कालिदास वाडकर व ज्ञानेश्वरी बालाजी गोदाची यांच्या संघाने १७ वर्ष वयोगटात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल संस्थासचिव प्राचार्य प्रमोद चौधरी, पर्यवेक्षक सिद्धार्थ बोडके, संस्थासदस्य प्रा. एम. व्ही. स्वामी, प्रा. बी. एस. बाबळसुरे, रसूल पठाण, क्रिडा समन्वयक किरण हाळीघोंगडे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!