महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा वर्धापनदिन संपन्न

0
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा वर्धापनदिन संपन्न

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा वर्धापनदिन संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिति शाखा उदगीर व राधाकृष्ण प्राथमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने महाराष्ट्र नुसता निर्मूलन समितीच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सर्प विज्ञान प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी रोहित बिरादार यांनी सापा संबंधी समाजात असलेल्या विभिन्न अंधश्रद्धावर प्रकाश टाकला. विषारी व बिनविषारी सापांविषयी त्यांनी माहिती दिली.साप दूध पीत नाही.सापाचे विष हे साप चावल्यानंतर औषध म्हणुन वापरले जाते. असे सविस्तर मार्गदर्शन या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य विजयकुमार पाटील होते. प्रमुख पाहुणे बाबूराव माशाळकर यानी अनिस ची पंचसूत्री सांगीतली, तर उदगीर अनिसचे सचिव बलीराम भुकतरे यानी वैज्ञानिक दृष्टिकोणावर प्रकाश टकला,विश्वनाथ मूडपे गुरुजी यांनी अनिसची स्थापना व कार्यपद्धतीवर सविस्तर विश्लेषण केले. समाजामध्ये असलेल्या अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी युवकांनी पुढे आले पाहिजे. असे आवाहनही त्यांनी केले. देविदास नादरगे गुरुजीनी शालेतील विविध उपक्रम सागीतले. समाज उपयोगी विविध उपक्रमांनी महाराष्ट्र अनिसचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्रीमती पाटील यानी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!