कृषी महाविद्यालय कृषीदुतांमर्फत अवलकोंडा व पिंपरी येथे जनावरांचे लसीकरण संपन्न
कृषी महाविद्यालय कृषीदुतांमर्फत अवलकोंडा व पिंपरी येथे जनावरांचे लसीकरण संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ संलग्नित कृषि महाविद्यालय, डोंगरशेळकी तांडा, उदगीर येथील बी.एस. सी. (मानद) कृषि पदवीच्या सातव्या सत्रातील विद्यार्थ्यां मार्फत मौजे पिंपरी येथे ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव आणि कृषि औद्योगिक संलग्नता अंतर्गत जनावरांचे लसीकरण कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये गाय, म्हैस, शेळी गटातील पशूंना लाळ व खुरकत रोगाचे लसीकरण व कृत्रिम रेतन, गर्भ तपसणी इत्यादी वेगवेगळे उपक्रम राबवण्यात आले.याप्रसंगी पशू वैद्यकीय महाविद्यायांतील प्राध्यापक डॉ. प्रफुल्ल पाटील, अवलकोंडा गावचे पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. वी. डी. वटकर यांनी उपस्थित सर्व पशुपालक, शेतकरी मंडळींना मार्गदर्शन केले. या उपक्रमअंतर्गत गावातील पशुपालक बिराजदार विनायक, बसवेश्वर बिराजदार, विकास बिराजदार, दत्ता केंद्रे यांच्यासह अनेक पशुपालकांनी पशूंना लसीकरण करून घेतले. या प्रसंगी पिंपरी गावाचे प्रतिष्ठित नागरिक, गावकरी उपस्थित होते. उपक्रमाचे नियोजन व आयोजन कृषी महाविद्यालयाचे सातव्या सत्रातील विद्यार्थी शेख अल्ताफ, शेख मतीन, शेंडगे आदर्श, शिंदे दिव्यरत्न, शिंदे ज्ञानेश्वर, शिंदे कुणाल, सोनकांबळे आदर्श, केतन मसाळ, संगमेश मातमशेटी, राहुल मतलाकुटे, महेश मोरे, संकेत नाईक, प्रसाद मिटकरी
यांनी केले. यासाठी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.पी. सुर्यवंशी, उप प्राचार्य डॉ. ए. एम. पाटील, कार्यक्रम समन्वय डॉ. एस. एन. वानोळे, कार्यक्रम अधिकारी डॉ. एस. आर. खंडागळे, तसेच विषयतज्ञ डॉ. सागर खटके यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
