भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद महा प्रवेशद्वाराचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते भुमीपुजन
भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद महा प्रवेशद्वाराचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते भुमीपुजन
उदगीर (एल.पी.उगीले) : देशाचे पहिले शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या नावाने प्रवेशव्दार उभारून पुढच्या पिढीला प्रेरणा मिळावी म्हणून महाप्रवेशद्वार उभारण्याचा निर्णय झाला होता. गेल्या १५ वर्षापासून प्रलंबित असलेल्या भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या महाप्रवेशव्दाराचा प्रश्न सोडवला असुन महाराष्ट्रातील एक देखणे प्रवेशव्दार या ठिकाणी उभारले जात आहे. गेल्या ५ वर्षाच्या काळात सर्व समाजघटकांना घेवुन मतदार संघाचा विकास केला. त्यामध्ये उदगीर विधानसभा मतदार संघातील अल्पसंख्यांक बांधवांचे प्रश्न प्राधान्याने आपण सोडवले असल्याचे मत महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
ते उदगीर शहरातील जळकोट रोड येथे
भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद महा प्रवेशद्वाराच्या भुमिपुजन सोहळया प्रसंगी बोलत होते.
यावेळी मौलाना एजाज ऊल हक, मौलाना जाकीर साब, मौलाना नौशाद साब, हफिज मोहीद्दीन, मौलाना युसुफ खासमी, खाजा कमरोद्दीन, समीर शेख, समद शेख, मुजिब खतीबसाब, वसंत पाटील, सय्यद जानीमियाँ, अनिल मुदाळे, फय्याज शेख, सनाउल्ला खान, इमरोज हाशमी, शहेबाज पठाण, श्रीहरी पाटील, नबीलउजमा, मौलाना हकीम, हुसनाबानो, वैशाली कांबळे, काजल मिरजगावे, सुनिता तेलंगे, आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी स्पष्ट केले की,आम्ही शिव, शाहु, फुले, आंबेडकरांचे पाईक आहोत. महापुरुषांच्या विचारधारेवर आमची वाटचाल आहे. मुस्लीम समाजाची शिक्षणाने प्रगती करावी म्हणून महायुती सरकारने मार्टी ची स्थापना केली. गेल्या अनेक वर्षापासुनच्या अल्पसंख्यांक बांधवांच्या मागणीला यश आल्याने अल्पसंख्यांक समाज हा मुख्यप्रवाहात येईल. मार्टी योजनेमुळे अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. यामुळे विविध पदावर काम करण्याची संधी त्यांना उपलब्ध होणार असुन आपल्या मतदार संघात अल्पसंख्याक वसतीगृहाला निधी दिला. शासकीय अध्यापक विद्यालयाच्या समोर
मुस्लीम शादीखाना उभारला, मुस्लीम मोहल्यात रस्ते, पाणी, वीज या मुलभुत गरजा पुरवुन त्या त्या वार्डात सभागृह उभारले, इदगाह मैदानावर संरक्षण भिंत बांधण्यासाठी निधी दिला, क्रबस्तानातील संरक्षण भिंत बांधकामासाठी निधी व विविध मस्जीदला निधी दिला, अशी माहिती दिली. यावेळी उदगीर शहर परिसरातील समाजबांधव व विविध पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
