नागतिर्थवाडी येथे शेतकऱ्यांना फवारणीसाठी मोफत औषध वाटप
नागतिर्थवाडी येथे शेतकऱ्यांना फवारणीसाठी मोफत औषध वाटप
उदगीर (एल.पी.उगीले) : मौजे नागतीर्थवाडी तालुका देवणी जिल्हा लातूर येथे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये महाराष्ट्र शासन कृषी विभागातर्फे, सोयाबीन शेती शाळा व मूल्य साखळी प्रयोग अंतर्गत गावातील शेतकऱ्यांना फवारणीसाठी मोफत नॅनो युरिया व नॅनो डीएपी चे वाटप करण्यात आले.
गावचे कृषी सहाय्यक जी. पी सूर्यवंशी यांनी सोयाबीन शेती शाळा व मूल्य साखळी प्रयोग अंतर्गत सोयाबीन कीड नियंत्रण व रोग प्रादुर्भाव संरक्षण यावर सखोल मार्गदर्शक करून नॅनो युरिया व नॅनो डीएपी यांची फवारणी कशी करायची याचे प्रात्यक्षिक सादर केले.
यावेळी गावच्या सरपंच सौ. कोमल राज गुणाले, ग्रामसेवक श्यामसुंदर क्षीरसागर, ग्राम पंचायत सदस्य भरत पेटे,योगेश कासले यादी सह गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
