नागपंचमी निमित्त दोन दिवस नागझरी येथे यात्रा व विविध उपक्रमाचे आयोजन
नागपंचमी निमित्त दोन दिवस नागझरी येथे यात्रा व विविध उपक्रमाचे आयोजन
लाखो भक्तांनी घेतले नागदेवतेचे दर्शन
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील नागझरी येथे नागपंचमीच्या निमित्ताने समस्त गावकरी मंडळी व नागनाथ देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने गावात यात्रा भरवली जाते या काळात नागझारी गावात नागदेवतेची महापुजा, मिरवणुक , जणावरांचे प्रदर्शन विविध खेळ व खाद्यपदार्थची दुकाने थाटतात. मनोरंजनासाठी नाटक इत्यादी विविध उपक्रमाचे आयोजन करून नागपंचमीचा सण दोन दिवस आनंदाने साजरा करण्यात आला
मन्याड खोऱ्यातील पर्वत रांगेत वसलेले पंचक्रोशीत सुप्रसिद्ध नवसाला पावणारा नागदेवता म्हणुन अहमदपूर तालुक्यातील नागझरी गावात नागपंचमीचा सण मोठया उत्साहात साजरा केला जातो नागपंचमीच्या निमित्ताने गावकरी व संयोजन समितीच्या वतीने दोन दिवस यात्रा भरवली जाते नागपंचमीच्या पहिल्या दिवशी नुतन तहसीलदार उज्वला पांगरकर व माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांच्या हस्ते नागदेवतेची महापुजा करून यात्रेची सुरवास करण्यात आली यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी ,गटविकास अधिकारी अमोलकुमार आंदेलवाड , सरपंच , चेअरमन उपसरपंच उध्दव इप्पर नागनाथ मंदिर देवस्थानचे पदाधिकारी आदिंची उपस्थिती होती
यात्रेत गावातील बैल, म्हशी, गाय, वासरे आदी जणावरांचे प्रदर्शन भरवण्यात आले लहान मुलांसाठी खेळण्याचे दुकाने , राहट पाळणा , मिठाईचे दुकाने , महीलांसाठी लागणाऱ्या साहीत्याची दुकाने, फळांची दुकाने यासह आजु बाजुच्या तालुक्यातील भाविक भक्तांसह लहान मुले वयोवृद्ध, महीलांनी गावातील परिसर गजबजुन गेला होता याप्रसंगी लाखो भाविक भक्तांनी नागदेवतेचे मनोभावे दर्शन घेऊन देवाला साकडे घातले
यात्रेच्या दुसऱ्या दिवसाची सुरवात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मंचकराव पाटील यांच्या हस्ते पहिली कुस्ती लावुन कुस्त्यांच्या सामन्याला सुरवात करण्यात आली यावेळी जि.प माजी सदस्य माधवराव जाधव उपसरपंच उध्दव इप्पर, सहाय्यक पोलीस निरिक्षक कंधारे देवस्थानचे पदाधिकारी आदींची उपस्थिती होती
शेवटाची कुस्ती ही ५००० रुपयेची नागनाथ मंदीर देवस्थान यांच्या वतीने घेण्यात आली यामध्ये दीपक सगरे विरूध्द खाजा शेख या दोघांमध्ये चुरसीचा सामना होऊन कुस्ती बरोबरी मध्ये सोडवण्यात आली. सायंकाळी नागदेवतेची मिरवणूक पालखी सोहळा काढण्यात आल्यानंतर ह.भ.प.विजयानंद महाराज सुपेकर यांचा कीर्तनाचा भाविकांनी लाभ घेतला.
यात्रेसाठी नागनाथ मंदीर देवस्थान ग्रामपंचायत, सेवाभावी सोसायटी, तरूण, व समस्त गावकरी यांच्या सहकार्यायामुळे आनंदाच्या वातावरणात उत्साहात पार पडली.
यात्रेत कुठलाही अनुचित प्रक्रार घडू नये यासाठी किनगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक कंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
