पोलीस उपनिरीक्षक रमेश आलापुरे यांचा सेवापूर्तीचा सोहळा उत्साहात साजरा
पोलीस उपनिरीक्षक रमेश आलापुरे यांचा सेवापूर्तीचा सोहळा उत्साहात साजरा
अहमदपूर (गोविंद काळे) : तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असाल तेथील कार्य सेवाभावी वृत्तीने निष्ठेने प्रामाणिकपणे आणि श्रद्धापूर्वक केल्यास त्या कार्याला लोकमानसात समाज मान्यता मिळते त्यामुळे समाजभिमुख कार्य करा असे आग्रही प्रतिपादन आमदार बाबासाहेब पाटील यांनी केले.
ते दि.11 रोजी संस्कृती मंगल कार्यालयात ढाळेगाव ग्रामस्थ आणि मित्रपरिवाराच्या वतीने आयोजित अहमदपूर पोलीस स्टेशनचे सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक रमेश आलापुरे यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून आमदार बाबासाहेब पाटील बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री बाळासाहेब जाधव, व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून आमदार बाबासाहेब पाटील, माजी मंत्री विनायकराव पाटील, माजी आमदार बब्रुवाहन खंदाडे ,गंगाखेडचे माजी आमदार ज्ञानोबा गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्राचे सरचिटणीस शिवानंद हेंगणे, उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर, सेवानिवृत्त उपविभागीय अधिकारी बलराज लंजिले, पोलीस निरीक्षक बिरप्पा भुसनर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख ,माजी नगरसेवक डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी, महेश बँकेचे संचालक दिलीप जाधव, भाजपा ओ बी सी सेल चे जिल्हाध्यक्ष ज्ञानोबा बडगिरे, बाजार समितीचे संचालक विशंभर पाटील, माजी नगरसेवक रहीम पठाण, माजी नगरसेवक अभय मिरकले, तलाठी संघाचे जिल्हाध्यक्ष गंगाधर दादेवाड, उत्सव मूर्ती रमेश आलापुरे, सुजाता ताई आलापुरे यांच्या सह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले की पोलीस प्रशासनामधील कार्य अतिशय अवघड असल्याचे सांगून सेवापूर्ती हा शब्द चुकीचा असून आपल्या कार्याला अध्यात्माची जोड दिल्यास ते काम अतिशय देखणे आणि चांगले होते. 35 वर्षाच्या सेवेत आलापुरे यांच्या चारित्र्यावर कुठलाही डाग पडला नसल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी, बलराज लंजिले, मनीष कल्याणकर, एडवोकेट भारत चामे, शिवानंद हेंगणे, माजी आमदार बब्रुवाहन खंदाडे यांचे मनोगतवर भाषणे झाली
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरद अलापूरे यांनी सूत्रसंचालन राम तत्तापूरे यांनी तर आभार दत्तात्रय आलापुरे यांनी मांनले.
रमेश आलापुरे आणि सुजाता आलापुरे यांचा संयोजन समितीच्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पहार मानाचा फेटा व सन्मानपत्र देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय आलापुरे, राज्य शिक्षक आदर्श आदर्श पुरस्कार विजेते राजकुमार चामे, किरण बेंबडे, गोपाळ आलापुरे, प्रल्हाद बेंबडे, अशोक पडिले यांच्यासह ग्रामस्थांनी व मित्र परिवारांनी विशेष परिश्रम घेतले.
