महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापकांचा माजी विद्यार्थ्यी भेटीच्या अभिनव उपक्रमास प्रारंभ

0
महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापकांचा माजी विद्यार्थ्यी भेटीच्या अभिनव उपक्रमास प्रारंभ

महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापकांचा माजी विद्यार्थ्यी भेटीच्या अभिनव उपक्रमास प्रारंभ

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य तथा ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून आज माजी विद्यार्थी व प्राध्यापकांमध्ये सुसंवाद नसल्यामुळे तो राहावा म्हणून महाविद्यालयातील काही निवडक प्राध्यापक सोयीनुसार रविवारी महाविद्यालयाच्या प्रारंभा पासूनच्या माजी विद्यार्थ्यांना अचानक भेट देऊन गुरु शिष्यांचे नाते अधिक दृढ होऊन सुसंवाद अबाधित रहावा या उद्देशाने माजी विद्यार्थ्यांच्या भेट मोहिमेचे आयोजन करत आहेत . नुकताच हैदराबाद येथे वास्तव्यास असलेल्या साधना वाघमारे या माजी विद्यार्थिनीशी भेट घेऊन सुसंवाद साधला आहे.
या बाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर तालुक्यातील उत्तर रूई या गावातील छोट्याशा वस्तीतील अत्यंत हलाखीच्या व गरीब परिस्थितीतून आलेली साधना विद्यार्थी दशेत महिन्यात ४-५ दिवस मोलमजुरी करून एस. टी. पासचे पैसे स्वतःच जमवायची व नियमित काॅलेज करायची. युवक महोत्सवातील एकांकिका, मुकाभिनयात गोल्ड मेडल प्राप्त केली.आज हैदराबाद सारख्या मेट्रो सिटीत स्थिरावलीय आणि अंबानी च्या रिलायन्स कंपनीत तेही चांगल्या पदावर कार्यरत आहे. तिला नितांत सुंदर, प्रेमळ कुटुंब व जोडीदार मिळाला आहे. साधनाचे पती हर्षवर्धन हे क्रोमोझोन आय. टी. कंपनीमध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत. ती हैदराबाद येथे राहते ही माहिती मिळताच हैद्राबाद येथे मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दु विद्यापीठात प्रशिक्षणासाठी आलेल्या प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांना व प्राध्यापकांना मनस्वी आनंद झाला व त्यांनी पूर्वाश्रमीची कु. साधना वाघमारे व कु. शाहु वाघमारे यांची अचानक भेट घेऊन आश्चर्याचा धक्का दिला.
महात्मा फुले महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. साधना मुळात गुणवंत तर आहेच त्याच बरोबर कलागुण संपन्न असलेल्या साधनाने विद्यापीठीय युवक महोत्सवात महाविद्यालयाला दोन मेडल मिळवून दिले. यावेळी तिची छोटी बहिण व महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी कु. शाहु वाघमारे पण उपस्थित होती. माजी विद्यार्थी साधनाला प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्यासह डॉ. सतीश ससाणे, डॉ. प्रकाश चौकटे, डॉ. मारोती कसाब , डॉ. डी .एन. माने व ग्रंथपाल प्रा. परमेश्वर इंगळे आदींनी भेट देऊन सुसंवाद साधला व तिच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!