महात्मा फुले महाविद्यालयात एस. आर. रंगनाथन यांची जयंती साजरी
महात्मा फुले महाविद्यालयात एस. आर. रंगनाथन यांची जयंती साजरी
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात ग्रंथालयशास्त्राचे जनक थोर विचारवंत डॉ. एस. आर . रंगनाथन यांची जयंती तसेच जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महात्मा फुले महाविद्यालयात प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व ग्रंथपाल प्रा. परमेश्वर इंगळे यांच्या वतीने ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर . रंगनाथन यांची जयंती तसेच जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी हे होते तर प्रोफेसर डॉ. नागराज मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते डॉ . रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.तसेच जागतिक आदिवासी दिनानिमित्त श्री अजय मुरमुरे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांनी केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. पांडुरंग चिलगर यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. बब्रुवान मोरे यांनी मानले. यावेळी प्रोफेसर डॉ. अनिल मुंढे , डॉ. प्रशांत बिरादार, डॉ. सचिन गर्जे , डॉ. संतोष पाटील, प्रकाश गायकवाड ,डॉ .सौ . सीमा उप्पलवार , प्रा. के. आर. कदम , प्रा.सौ . प्रतीक्षा मंडोळे, प्रशांत डोंगळीकर, अजय मुरमुरे, वामनराव मलकापुरे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
