संत ज्ञानेश्वर विद्यालयात नागपंचमी निमित्त सर्प संरक्षण व जनजागृती अभियान

0
संत ज्ञानेश्वर विद्यालयात नागपंचमी निमित्त सर्प संरक्षण व जनजागृती अभियान

संत ज्ञानेश्वर विद्यालयात नागपंचमी निमित्त सर्प संरक्षण व जनजागृती अभियान

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात नागपंचमीनिमित्त वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन सोसायटी,लातूर अंतर्गत सर्पमित्र शिरूरकर ग्रुपच्या वतीने सापाबद्दल चे समज – गैरसमज सांगून जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका आशा रोडगे होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक मीना तोवर, प्रमुख मार्गदर्शक म्हणून सर्पमित्र सुदर्शन पाटील, अमोल शिरूरकर,नागेश वरवटे, गोरख खेडकर, दयानंद हाके, गणेश बुलबुले,शंकर पाटील सह सर्पमित्र उपस्थित होते. सुदर्शन पाटील पुढे बोलताना म्हणाले की,
साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे.तसेच आपल्या भागात प्रामुख्याने चार विषारी जातीचे साप आढळतात त्यात. नाग,मण्यार, फुरसे, घोणस व बिनविषारी मध्ये तस्कर, गवत्या, रुका,कवड्या, धामण, दिवड, कुकरी, डूरक्या घोणस,वाळा, नाणेटी,हे साप आहेत.आपल्याला
सर्पदंश झाल्यास प्रथमोपचार म्हणून सर्प दंश झालेली जखम वाहत्या पाण्यात किंवा नळाखाली स्वच्छ धुवावी शक्य तेवढे जखमेतून रक्त काढून टाकावे.तसेच आवळपट्टी बांधाताना हाताला सर्पदंश झाला असेल तर दंडाला व पायाला सर्पदंश झाला असेल तर मांडीला आवळपट्टी बांधून त्या व्यक्तीला प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जावे.सापाला
मारण्यापेक्षा वाचवण्यात खरा आंनद आहे.असे मत सर्पमित्र सुदर्शन पाटील व अमोल शिरूरकर यांनी व्यक्त केले.विद्यार्थ्यांनी विचारलेले प्रश्नांचे निरसनही केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश साबणे यांनी केले तर आभार नंदकुमार मध्येवाड यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.पर्यावरण गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!