रुद्र महिला मंडळाच्या वतीने सिद्धांत शिखामणीचे पारायण
रुद्र महिला मंडळाच्या वतीने सिद्धांत शिखामणीचे पारायण
अहमदपूर (गोविंद काळे) : प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी रुद्र महिला मंडळाच्या वतीने श्रावण मासानिमित्त सिद्धांत शिखामणीचे पारायण चालू असून जास्तीत जास्त महिलांनी या ज्ञानयज्ञात सहभागी व्हावं असे आवाहन रुद्र महिला मंडळाच्या अध्यक्षा विजयाताई चवंडा यांनी केले आहे. हे मंडळ गेल्या चार दशकापासून विविध सामाजिक, अध्यात्मिक कार्यक्रम घेत असते.
जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यांच्या आवाहानाप्रमाणे
वडाच्या, बेलाच्या झाडाचे वृक्षरोपण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
नागपंचमी निमित्त भूलई, फुगडी, मंगळागौरीचे खेळ, इत्यादी मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन रजनी महाजन यांनी केले.
अध्यक्षीय समारोपप्रसंगी विजयाताई चवंडा म्हणाल्या की, विज्ञानाने खूप प्रगती केली आहे. परंतु अध्यात्माशिवाय आत्मिक समाधान नाही. म्हणून प्रत्येकांनी मन शांतीसाठी आपल्या व्यस्त दिनचर्येतून अध्यात्मासाठी वेळ काढावा असे मत व्यक्त केले. रुद्र महिला मंडळाच्या स्थापनेपासून म्हणजे 1980 पासून मंडळाच्या वतीने श्रावण मासात शिवलीलामृत,परमरहस्य, काशीखंड,भक्ती विजय, हरी विजय, राम विजय, नवनाथ अशा विविध पोथ्यांचे पारायण करून विज्ञानाची व अध्यात्माची सांगड घालण्यात येत आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कांचन काडवादे यांनी केले. सूत्रसंचालन शिवाणी चंवडा यांनी केले तर आभार संगीता मिरकले यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी रुद्र महिला मंडळाच्या उपाध्यक्षा विजयाताई हामणे, सचिव शोभा शेटकर, सहसचिव कस्तुर कल्याणी, कोषाध्यक्षा शांता गिराम सह सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
