सकल मराठा समाजाच्या वतीने नितेश राणे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारून, दहन

0
सकल मराठा समाजाच्या वतीने नितेश राणे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारून, दहन

सकल मराठा समाजाच्या वतीने नितेश राणे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारून, दहन

उदगीर (एल. पी. उगिले) : मराठा आरक्षणासाठी योद्धाची भूमिका घेऊन, लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या बद्दल सतत अपशब्द वापरून आपण काहीतरी फार मोठे आहोत. असे दाखवण्याचा प्रयत्न करणारे नितेश राणे यांच्या या कृतीचा उदगीर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला. तसेच उदगीर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये नितेश राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून त्याचे दहन करण्यात आले. सकल मराठा समाजाच्या वतीने राणे यांच्या विरोधामध्ये घोषणाही देण्यात आल्या. भविष्यात मनोज जरांगे पाटील यांच्या बद्दल अपशब्द वापरलेले सकल मराठा समाज कदापि सहन करणार नाही. असा इशाराही या निषेध आंदोलनातून देण्यात आला.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते चंद्रसेन मोहिते, युवा नेते बाळासाहेब पाटोदे, प्रशांत जगताप, आशिष पाटील राजूरकर, विवेक सुकणे, छावा संघटनेचे दत्ता पाटील, संदीप पाटील, प्रशांत बिरादार, शिवाजी भोळे, बाबासाहेब सूर्यवंशी, गोविंद बिरादार, गिरीश सूर्यवंशी, दशरथ कोयले, गणेश मुंडकर, नितीन बिरादार, विवेक जाधव, कृष्णा घोगरे, राहुल बिरादार, सचिन पाटील, पंकज कालनी, रामराव रावणगावे, अंकुश ताटपल्ले, श्रीनिवास एकुरकेकर, सतीश पाटील मानकीकर, बालाजी नादरगे, मधुकर बिरादार, पवन ढोबळे, राजकुमार माने, बाळू पाटील, करण मोरे, पिंटू भोसले, बाबासाहेब एकुरकेकर, पपन पाटील, विजय पाटील, विश्वजीत बिरादार, पुंडलिक वाकोडे, दीपक पाटील, विजयकुमार बामणीकर, बसवराज स्वामी महाराज, राम पाटील, रघुवीर पाटील, महेश माने, विक्रम सूर्यवंशी इत्यादी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!