भगवा सप्ताह निमित्त शिवसेना सदस्य नोंदणीला गती देणार – चंद्रकांत टेंगेटोल
भगवा सप्ताह निमित्त शिवसेना सदस्य नोंदणीला गती देणार - चंद्रकांत टेंगेटोल
उदगीर (एल. पी. उगिले) : शिवसेनाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उदगीर विधानसभा मतदारसंघात भगवा सप्ताह साजरा केला जातो आहे. या सप्ताहात सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गोरगरीब जनतेसाठी मोफत नेत्ररोग तपासणी व नेत्र शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या शिबिराला उत्स्फूर्तपणे मोठा प्रतिसाद मिळाला. शिवसैनिकांच्या सामाजिक कार्यामुळे शिवसेना लोकाभिमुख होत आहे, आणि सध्या शिवसेनेच्या सदस्य नोंदणी मोहिमेला गती मिळत आहे. ती गती आणखी वाढवणार आहे. असे विचार शिवसेनेचे उदगीर तालुकाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांनी व्यक्त केले.
या सप्ताह निमित्त आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, विधानसभा संपर्कप्रमुख देवेंद्र कांबळे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये शिवसेना सदस्य नोंदणी फॉर्मचे वाटप शाखाप्रमुखांना करण्यात आले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सुशांत जाधव आणि विश्वजीत बिरादार यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश झाला. तसेच ग्रामपंचायत कर्मचारी सेनेमध्ये विठ्ठल श्रीमंगले, राम सूर्यवंशी, सत्तार पठाण, चांद बेग मिर्झा, तुकाराम कांबळे, प्रवीण कांबळे, बालाजी मेहत्रे, नागनाथ पांचाळ, रोहित थोरे, विजयकुमार घोगरे, विष्णुदास केंद्रे, राजकुमार कमलापुरे, चंनबसप्पा स्वामी या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश झाला. त्यांच्याकडून अधिकृतपणे सदस्य नोंदणी फॉर्म भरून घेण्यात आला. याप्रसंगी अहमदपूर विधानसभा संपर्कप्रमुख मुर्गेश पिल्ले, उदगीर तालुकाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल, उपजिल्हाप्रमुख अंकुश कोंनाळे, शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष सचिन साबणे, श्रीमंत सोनाळे, जळकोट तालुकाप्रमुख मुक्तेश्वर येवरे, शहरप्रमुख अनिल पंचाक्षरी, युवा सेना जिल्हा सरचिटणीस रमण माने, चंद्रकांत सांगळे, बालाजी पुरी, नंदकुमार माने, अण्णाराव कांबळे, विष्णू भाई चिंतलवार, प्रा. तातेराव मुंडे, रामदास काकडे, बाळू वडले, अविनाश राठोड, संतोष निडेबने ,बापूराव कदम, संगम मेहत्रे, संजय मठपती, विशाल गोटमुकले, शिवप्रसाद लांडगे, लक्ष्मीकांत गुडमेवार, सुभाष गुंडीले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना चंद्रकांत टेंगेटोल म्हणाले की, जनता आता भारतीय जनता पक्षाच्या फसव्या घोषणा आणि निवडणुकीच्या तोंडावर दिले जाणारे मोठमोठे आश्वासन याला कंटाळली आहे. शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा आघाडी सरकार यावे. अशी ईश्वराकडे प्रार्थना करू लागली आहेत. त्यामुळे आम्हाला शिवसेनेत सदस्य नोंदणीला गती मिळत आहे. सर्वसामान्य नागरिक आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत आहेत, असेही सांगितले.
