आ. बाबासाहेब पाटील यांच्याकडून नुतन प्रशासकीय इमारतीची पाहणी
आ. बाबासाहेब पाटील यांच्याकडून नुतन प्रशासकीय इमारतीची पाहणी
अहमदपूर (गोविंद काळे) : अहमदपूर मतदार संघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी येथील प्रशासकीय इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करून समाधान व्यक्त केले.
यापूर्वीची इमारती जीर्ण झाली होती आणि त्यामध्ये जागाही अपूरी पडत होती. त्याठिकाणी अधिकारी व कर्मचाऱ्यांना काम करताना अनेक अडचणीना सामना करावा लागत होता. त्यामध्ये खेडयापाड्यातून आलेल्या नागरीकांचाही वेळ वाया जात होता. या सर्व अडचणींमुळे नवीन प्रशासकीय इमारत उभारावी अशी मागणी नागरिकांनी केली होती. त्यानुसार आमदार बाबासाहेब पाटील यांनी त्यावेळी जुन्या इमारतीची पाहणी करून करून नवीन इमारत उभारण्याचेही आश्वासन दिले होते. त्यानुसार प्रशासकीय इमारतीसाठी मुंबई येथे अनेकवेळा पाठपुरावा करून अखेर मंजूरी मिळवून प्रत्यक्ष कामास सुरुवात होवून काम पूर्ण झाले असून या इमारतीमध्ये सर्व शासकीय कार्यालये एकच ठिकाणी येणार असून नागरिकांची कामे देखील लवकर होण्यास मदत होणार आहे. या इमारतीमध्ये अनेक शासकीय कार्यालये असल्यामुळे नागरीकांना कुठेही जाण्याची गरज भासणार नाही याचे आमदार पाटील यांनी समाधान व्यक्त केले. लवकरच या इमारतीचा लोकार्पण सोहळा पार पाडून जनेतेच्या सेवेत उपलब्ध होईल, असे आमदार बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.
प्रसंगी कृउबास माजी सभापती शिवानंद हेंगणे , उपजिल्हाधिकारी मंजुषा लटपटे, अहमदपूरच्या नूतन तहसीलदार उज्वला पांगरकर, चाकूर तहसीलदार नरसिंग जाधव, बाबुभाई रुईकर, माजी नगरसेवक रहिमखान पठाण, चांदु पाटील, जावेद बागवान, अय्याज शेख, इलाही बागवान, अहमदपूर गटविकास अधिकारी अमोलकुमार अंदेलवाड, चाकुर गटविकास अधिकारी वैजनाथ लोखंडे, नायब तहसीलदार मधुकर क्षीरसागर, नायब तहसीलदार विलासराव जगताप आदींची उपस्थिती होती.
