सार्वजनिक ग्रंथालयाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार – ना.संजय बनसोडे
सार्वजनिक ग्रंथालयाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार - ना.संजय बनसोडे
उदगीर (एल.पी.उगीले) : राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयाचे प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन राज्याचे क्रिडा व युवक कल्याण मंत्री ना.संजय बनसोडे यांनी दिले.
महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयाचे, ग्रंथालय कर्मचार्यांचे विविध मागण्या आचार संहिता जाहिर होण्याअगोदर आदेश काढावा. या मागणीसाठी उदगीर जळकोट विधानसभा मतदार संघातील सार्वजनिक ग्रंथालयाचे पदाधिकारी ,ग्रंथपाल व सेवक यांनी उदगीरचे आमदार तथा राज्याचे क्रिडा व युवक कल्याण मंत्री ना.संजय बनसोडे यांची भेट घेऊन विविध मागण्याचे निवेदन दिले .यात गत 2012 पासुन नविन वाचनालयास मान्यता,दर्जाबदल व अनुदान वाढ बंद आहे तरी नविन ग्रंथालयांना मान्यता द्यावी, ग्रंथालयांना दर्जावाढ मिळावी, तसेच संविधानाच्या सभागृहात उच्च व तंत्रशिक्षण खात्याचे मंत्री ना.चंद्रकांत दादा पाटिल यांनी सार्वजनिक ग्रंथालया च्या मागण्या संदर्भात केलेल्या घोषणेची अमलबजावणी करावी व सार्वजनिक ग्रंथालयाचे थकित 40% अनुदान तात्काळ जमा करावे.आचार संहिता लागू होण्या अगोदर मंत्री मंडळ बैठकित निर्णय घेऊन शासन आदेश काढण्याची विधान सभा सभागृहात केलेल्या घोषणेची अमलबजावणी करावी अश्या मागण्याचे निवेदन मंत्री महोदयांना देण्यात आले.यावेळी ना.संजय बनसोडे म्हणाले की, राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयाच्या मागण्या मान्य करुन घेण्यासाठी मुख्यमंत्री.ना.एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडवणिस उपमुख्य मंत्री ना. अजितदादा पवार ,खात्याचे मंत्री चंद्रकांत दादा पाटिल यांचे कडे पाठपुरावा करुन सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथपालांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगीतले.
यावेळी लातूर जिल्हा ग्रंथालय संघाचे कोषाध्यक्ष राम मोतीपवळे, संचालक तथा ग्रंथ मित्र सुर्यकांत सिरसे, सुभाष बिरादार, यशवंत पाटिल, लक्ष्मण फुलारी, नागनाथ बिरादार, दयानंद सोनटक्के, शेंबाळे धर्मण्णा,आनंद ताटेकर,राजेश्वर स्वामी,शांतकुमार बिरादार,आत्माराम शेळगे,शादूर शेख, रामेश्वर बिरादार, तांबोळी मन्सुर, शिवलिंग कडोळे,संजिव केंद्रे,गंगाधर केंद्रे,इश्वर शेरे,पंचाक्षरी स्वामी,ढवळे जळबा,अॅड तानाजी साखरे,प्रविण सोमवंशी,चंद्रखेर ढगे,कासार हैतरसाब, वाडकर धोंडिराम,संगमेश्वर पाटिल, शांतकुमार बिरादार,गुणवंत मुळे,अशोक धुप्पे, लक्ष्मीबाई कांबळे,विश्वनाथ मानसे,सुजाता बिरादार,ज्ञानेश्वर पारसेवार,रामदास बेंबडे, सौ.रेखा लाला,विजयमाला मेदगे, दत्तात्र्य सोनकांबळे,बालाजी पाटिल,विठ्ठल बिरादार,शंकर दत्तनुरे, तेलंगे अशोक, दिनेश पाटिल,यशवंत कुलकर्णी, राजपाल देवशेट्टे, महादेव हावा,शिवकुमार बिरादार कुमठा, शिवसार्जून शेटकार,विनायक फड, सोमनाथ बिरादार , एन.एम बिराजदार, माधव मिरजगावे, अशोक कारभारी, राजपाल देवशेट्टे, बालकुंदे शिवकुमार, प्रविण सुर्यवंशी ,शिवाजी चिल्ले यांच्या सह उदगीर जळकोट मतदार संघातील ग्रंथालय क्षैत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
