1 कोटी 19 लाख 72 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू वाहनासह जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
1 कोटी 19 लाख 72 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू वाहनासह जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
लातूर (एल.पी.उगीले) : लातूर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला मात्र मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात चालू असलेला, गुटखा पकडला आहे. तब्बल एक कोटी एकोणीस लाख 72 हजार रुपयांचा गुटखा आणि सदरील गुटख्याचे वाहतूक करण्यासाठी उपयोगात येणारे वाहन जप्त केले आहे.
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की,पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी अवैध धंद्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देशित केले आहेत. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे,अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदारांचे पथक तयार करून लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढून त्यावर कारवाई करण्याची मोहीम राबवित आहेत.
अवैध धंद्याची माहिती काढत असताना दिनांक 12/08/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकास खात्रीशीर माहिती मिळाली की, पोलीस ठाणे मुरुड हद्दीमध्ये काही इसमांनी त्यांच्या फायद्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले अन्नपदार्थ तंबाखूजन्य गुटख्याची अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी साठवून ठेवलेला आहे.अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर माहितीची शहानिशा करून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व अमलदारांच्या पथकाने दिनांक 12/08/ 2024 रोजी सकाळी मुरुड येथील गुट्टे नगर परिसरामध्ये वेगवेगळ्या घरामध्ये दोन ठिकाणी छापा मारला असता तेथे महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेले वेगवेगळ्या कंपनीचे,महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित असलेले गुटका व सुगंधित पानमसाला असा अनुक्रमे 66 लाख 40 हजार 101 रुपयाचा व दुसऱ्या ठिकाणी 53 लाख 32 हजार 240 असा एकूण 01 कोटी 19 लाख 72 हजार 341 रुपयांचा एकूण रुपयांचा प्रतिबंधित गुटका व सुगंधित पान मसाला तंबाखू चा मुद्देमाल तसेच वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारा छोटा हत्ती वाहन मिळून आल्याने ते मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.
पोलीस ठाणे मुरुड येथे प्रतिबंधित गुटका व सुगंधित तंबाखूची अवैधरित्या साठवणूक केल्याचे मिळून आलेले इसम नामे अनिल वसंत कापसे,(रा. गुट्टे नगर, मुरुड),विशाल गुट्टे, (रा. मुरुड), संदिपान बाबुराव विटेकर, (रा. मुरुड),
बाळासाहेब ब्रिजलाल लोहिया, (रा. मुरुड),भैरू नरसू गुट्टे, (रा. गुट्टे नगर मुरुड).यांच्यावर अनुक्रमे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे मुरुड पोलीस करीत आहेत.सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, यांचे नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वंभर पल्लेवाड, पोलीस अमलदार विनोद चिलमे, रामहरी भोसले, माधव बिल्लापट्टे, नवनाथ हासबे,मोहन सुरवसे, रियाज सौदागर, तुराब पठाण, राजाभाऊ मस्के, जमीर शेख, प्रदीप चोपणे यांनी पार पाडली.
