हातभट्टी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर तसेच देशी-विदेशी दारूची अवैध विक्री करणाऱ्यावर छापेमारी
हातभट्टी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर तसेच देशी-विदेशी दारूची अवैध विक्री करणाऱ्यावर छापेमारी
लातूर (एल.पी.उगीले) : लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्यावर प्रभावी कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबवून अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अचानकपणे लातूर जिल्ह्यातील लपून-छपून हातभट्टी तयार करणाऱ्या ठिकाणावर वरिष्ठांचे मार्गदर्शनात जोरदार कारवाई करत 72 गुन्हे दाखल करून अकरा लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला होता.
हातभट्टी तयार करणाऱ्या ठिकाणावर तसेच देशी-विदेशी दारूची अवैध विक्री व्यवसाय करणाऱ्यावर छापेमारी करून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अवैध धंद्यावर कार्यवाही करण्यासाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेमध्ये लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील दुर्गम भागात लपून- छपून हातभट्टी तयार करून त्याची साठवणूक व विक्री करणाऱ्यावर तसेच देशी-विदेशी मद्याची अवैध विक्री व्यवसाय करणारे 42 इसमावर 41 गुन्हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये हातभट्टी, हातभट्टीचे रसायन, देशी, विदेशी दारू असा एकूण 4 लाख 76 हजार 435 रुपयांचा मुद्देमाल जप्त व हातभट्टी दारू व हातभट्टीचे रसायन नष्ट करण्यात आले आहेत.अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे,अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांचे सूचना व मार्गदर्शनात लातूर पोलिसा कडून अवैध धंद्याविरुद्ध जोरदार कारवाई करण्यात येत असून सदरची कारवाई यापुढे ही सुरूच राहणार आहे. असे पोलीस सूत्राकडून कळविण्यात आले आहे.
