घरफोडीच्या गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगाराला सोन्याच्या दागिन्यासह 78 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त

0
घरफोडीच्या गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगाराला सोन्याच्या दागिन्यासह 78 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त

घरफोडीच्या गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगाराला सोन्याच्या दागिन्यासह 78 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त

लातूर (एल.पी.उगीले) : जिल्ह्यात होत असलेल्या घर पुढे आणि चोऱ्यांच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सक्रिय झाला आहे अशाच पद्धतीच्या गुन्ह्याचा तपास लावण्यात यश आले आहे. याबाबत थोडक्यात माहिती की, लातूर जिल्ह्यातील मुरुड पोलीस ठाणे हद्दी मध्ये रात्रीच्यावेळी राहते घरचे खिडकी च्या ग्रील कटरने कापून घरामध्ये प्रवेश करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी झाल्याची घटना घडली होती. त्यावरून पोलीस ठाणे मुरुड येथे अज्ञात आरोपी विरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अधीक्षक सोमय मुंडे ,अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अमलदारांचे पथके तयार करून नमूद गुन्ह्याचा तपास करण्यात येत होता सदर पथकाला त्यांना सखोल मार्गदर्शन व सूचना आल्या होत्या.
सदर पथकाकडून गुन्ह्या संदर्भात बारकाईने तपास सुरू असताना मोठ्या प्रमाणात बातमीदार नेमून तसेच तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेण्यात येत होते.वरिष्ठांचे मार्गदर्शनात सदरच्या पथकांनी केलेल्या परिश्रमामुळे पथकांना गुप्त बातमीदाराकडून खिडकीचे ग्रील कापून घरफोडी करणाऱ्या करणाऱ्या आरोपींची माहिती मिळाली.नमूद घरफोडीतील गुन्हेगार त्याने चोरलेला सोन्याचा मुद्देमाल विकण्यासाठी मुरुड मधील जनावराच्या बाजाराजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. सदर माहितीची खातरजमा करून सदरचे पथक तात्काळ नमूद परिसरात सापळा लावून संशयित आरोपीला ताब्यात घेतले.
सदर पथकांनी अतिशय कुशलतेने सापळा लावून घरफोडीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीला दिनांक 09/08/2024 रोजी ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव आबा आप्पा शिंदे, (वय 28 वर्ष, राहणार मोहा तालुका कळंब जिल्हा धाराशिव. सध्या राहणार गोवर्धनवाडी, ढोकी पाणी प्लांट च्या पाठीमागे जिल्हा धाराशिव) असे असल्याचे सांगितले.
त्याची झडती घेतली असता त्याच्या पॅन्ट च्या खिशामध्ये त्यामध्ये सोन्या चे दागिने मिळून आले.त्याबाबत त्याच्याकडे विचारले तेव्हा त्याने त्याच्या इतर साथीदारासह मिळून चार दिवसापूर्वी मुरुड तालुक्यातील एका घराचे खिडकीचे गज कापून घरफोडी, गुन्हा केल्याचे व त्या गुन्ह्या मध्ये चोरलेला,त्याच्या हिश्याला आलेले सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल असल्याचे कबूल केले. त्यावरून नमूद आरोपीस त्याने चोरलेल्या सोन्याचे दागिने, व गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण 78 हजार 225 रुपयाचा मुद्देमालासह ताब्यात घेऊन पुढील कारवाई करिता पोलीस ठाणे मुरुड यांचे ताब्यात देण्यात आले आहे. असून त्याच्या सोबत इतर आरोपी साथीदारांचा शोध सुरू आहे.
वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने अतिशय उत्कृष्टरित्या तपास करून घराचे खिडकीचे ग्रील कापून चोरीचा गुन्हा करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळून त्यांच्याकडून चोरलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदरचा गुन्हेगार हा सराईत असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनात अतिशय कुशलतेने व माहितीचे संकलन करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नमूद आरोपींला ताब्यात घेतले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथका मधील पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले,सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार पुणेकर, पोलीस अमलदार रामहरी भोसले, सिद्धेश्वर जाधव, सुधीर कोळसुरे, योगेश गायकवाड, प्रकाश भोसले, धनंजय गुट्टे, सुहास जाधव, पोलीस चालक अमलदार चंद्रकांत केंद्रे यांनी केली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!